रिअलमी (Realme) ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. या कंपनीने नुकतेच रिअलमीचे लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केले आहेत. या नवीन सिरीजचे नाव रिअलमी १२ (Realme 12) आणि रिअलमी १२ प्लस (Realme 12 Plus ) असे आहे. तसेच हे स्मार्टफोन आज दुपारी ३ वाजल्यापासून खरेदीसाठी सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. रिअलमीच्या या नवीन स्मार्टफोनच्या किंमतीपासून ते बँक ऑफरपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी या लेखातून जाणून घेऊ.
कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन मिडरेंज प्राईस सेगमेंटमध्ये लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन अलीकडे लाँच झालेल्या रिअलमी १२ प्रो (Realme 12 Pro) सीरिजसारखेच दिसतात.
रिअलमी १२ चे (Realme 12) फीचर्स :
रिअलमी १२ मध्ये ६.७२ इंच एफएचडी प्लस आयपीएस एलसीडी (6.72-इंच FHD+ IPS LCD) स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आणि 950 nits पीक ब्राइटनेस आहे. मीडिया टेक Dimensity ६१०० प्लस चिपसेटद्वारे परिपूर्ण आहे. तसेच यात ५,००० एमएएच बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रिअलमीमध्ये २ एमपी पोर्ट्रेट सेन्सर सोबत १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच रिअलमीमध्ये दोन वर्षांच्या Android अपडेट आणि तीन वर्षांच्या सुरक्षा पॅच देण्याचे ग्राहकांना वचन देण्यात आले आहे. रिअलमी १२, १२८ जीबी स्टोरेजसह येतो आणि ८ जीबी (8GB) रॅम ऑफर करतो. यामध्ये असणारे साइड-माउंट पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जे ‘डायनॅमिक बटण’ म्हणून कार्य करते. रिअलमी म्हणते की, याचा उपयोग करून तुम्ही आवाज बदलणे, डू नॉट डिस्टर्ब मोड सक्षम करणे, कॅमेरा ओपन करणे आदी अनेक गोष्टी करू शकता.
रिअलमी १२ प्लस (Realme 12 Plus ) फीचर्स :
रिअलमी १२ प्लसमध्ये २,००० नीट्सचा कमाल ब्राइटनेससह ६.६७ इंच एफएचडी प्लस १२० एचझेड AMOLED स्क्रीन आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ‘रेनवॉटर स्मार्ट टच’ आहे. रिअलमी डायमेन्सिटी ७०५० चिपसेटसह फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेजसह येतो. रिअलमी १२ प्रमाणेच रिअलमी १२ प्लसमध्ये डिव्हाइस अँड्रॉइड १४ वर आधारित रिअलमी UI 5.0 वर चालते आणि दोन वर्षांचे Android अपडेट आणि तीन वर्षांचा सुरक्षा पॅच देण्याचे ग्राहकांना वचन देतात. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि तो ३.५ मिमी ऑडिओ जॅकसह येतो, जो सहसा तुम्हाला इतर फोनमध्ये दिसणार नाही. यात ५० एमपी सोनी एलव्हायटी ६०० (Sony LYT-600) प्राथमिक सेन्सर, ८ एमपी अल्ट्रावाइड लेन्स आणि २ एमपी मॅक्रो कॅमेरा फ्रंट पंच होल डिस्प्लेसह १६ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. हे सर्व ५,००० एमएचए बॅटरीद्वारे परिपूर्ण आहे, जे ६५ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हेही वाचा…आधार कार्ड अपडेट ते इन्कम टॅक्स रिटर्नपर्यंतची ‘ही’ कामे ३१ मार्चपूर्वी उरका, नाही तर मोठा दंड
रिअलमी १२ आणि रिअलमी १२ प्लसची किंमत आणि ऑफर :
१२८ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅमसह येणाऱ्या रिअलमी १२ च्या बेस व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे, तर ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे. तर रिअलमी १२ प्लसमध्ये १२८ जीबी व्हेरिएंट २०,९९९ तर २५६ जीबी व्हेरिएंट २१,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.
रिअलमीकडून आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि एसबीआय बँक कार्ड असणाऱ्या ग्राहकांना २,००० रुपयांची बँक सवलतदेखील दिली जात आहे. रिअलमी १२ आणि रिअलमी १२ प्लसची विक्री आज दुपारी ३ वाजल्यापासून सुरू झाली असून ते फ्लिपकार्ट आणि रिअलमी वेबसाइटवरच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.