Realme ने भारतीय बाजारपेठेमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च नकरतच असते. यावेळी कंपनीने Realme Narzo N55 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स असणार आहेत, याचा कॅमेरा कसा असणार आणि या फोनची किंमत किती असणार हे जाणून घेऊयात.

Realme Narzo N55 चे फीचर्स

Realme Narzo N55 मध्ये तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असे दोन प्रकार उपलब्ध असणार आहेत. तसेच या फोनमध्ये तुम्हाला ६.७२ इंचाचा फुल HD + LCD स्क्रीनचा डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला ९०Hz चा रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. या फोनचे रिझोल्युशन हे १०८०X२४०० पिक्सल इतके आहे.

mithun chakraborty
सलग ३३ फ्लॉप, तर एकूण १८० फ्लॉप सिनेमे देणारा बॉलीवूड अभिनेता; ४०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा आहे मालक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
China Chinese Artificial Intelligence startup DeepSeek
अमेरिकेच्या ‘टुकार’ चिपनिशी चीनचा भन्नाट तंत्राविष्कार…चायना-मेड ‘DeepSeek’ चॅटबोटने जगभर खळबळ का उडवली?
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…
bsnl customers loksatta news
‘बीएसएनएल’कडून दूरध्वनी जमा केल्याचा परतावा मिळत नसल्याने डोंबिवली, कल्याणमधील ग्राहक हैराण
Vasai, Municipal Corporation, CCTV , beautification,
वसई : पालिकेने सुभोभीकरणासाठी हटवले चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे
Image Of Vijay Shekhar Sharma
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल
sambhav
भारतीय लष्कर वापरत असलेला संभव स्मार्टफोनमध्ये कोणत्या खास गोष्टी आहेत? जाणून घ्या…

हेही वाचा : Tech Layoffs: येत्या काळात Google पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करणार का? CEO सुंदर पिचाई म्हणाले…

कसा असणार कॅमेरा ?

रिअलमीच्या या फोनमध्ये तुम्हाला ६४ मेगापिक्सलचा AI प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तसेच २ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे मिळतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

रिअलमीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला ३३ W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित UI 4.0 वर चालतो. या फोनमध्ये MediaTek Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने याचे स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, हा स्मार्टफोन ड्युअल-बँड वायफाय, 4जी एलटीई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसह येतो.

हेही वाचा : Salesforce मधून नोकरी गेल्यावर महिला कर्मचारी भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “मला सुरुवातीला…”

Realme Narzo N55 ची किंमत

Realme Narzo N55 या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये इतकी आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये इतकी आहे. या दोन्ही व्हेरिएंटच्या खरेदीवर १,००० रुपयांचा स्पेशल ऑफर देखील मिळत आहे. यासाठी तुम्हाला HDFC किंवा SBI च्या कार्डावरून पेमेंट करावे लागेल. या फोनचा पहिला सेल हा १८ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान सुरु होऊ शकतो. हा फोन तुम्ही Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईट व रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येणार आहे.

Story img Loader