रिअलमी ही एक लोकप्रिय मोबाईल कंपनी आहे. ही कंपनी आज मिड-रेंज नाझरो ७० सीरिज भारतात लाँच करणार आहे. रिअलमीच्या या नवीन स्मार्टफोनचे नाव नाझरो ७० प्रो ५जी (Narzo 70 Pro 5G) असे आहे. देशातील अनेक नवीन लाँच झालेल्या मिड-रेंजच्या स्मार्टफोनशी नाझरो ७० प्रो ५जी स्पर्धा करण्याची शक्यता आहे; ज्यात रेडमी नोट १३, पोको एक्स६ निओ, आयक्यूओओ झेड ५जी, नथिंग फोन २ए आदींचा समावेश आहे.
नाझरो७० प्रो ५जी हा स्मार्टफोन लाँच होण्याआधी त्याच्या काही फीचर्सची माहिती समोर आली आहे. या आगामी स्मार्टफोनला मीडिया टेक ७०५० चिपसेटचा सपोर्ट असेल आणि ८जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात येईल. नाझरो७० प्रो ५जी मध्ये ५०एमपी सोनीआयएमएक्स ८९० (Sony IMX890) सेन्सर कॅमेरा आणि ६७ डब्ल्यू SUPERVOOC फास्ट चार्जरसह ५,००० एमएएच बॅटरीदेखील असेल.तसेच खास गोष्ट म्हणजे, नाझरो७० प्रो ५जीमध्ये ‘एअर जेश्चर’ देण्यात आले आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना स्मार्टफोनला हात लावण्याची गरज नाही. फक्त हाताच्या इशाऱ्यांवर हा फोन कंट्रोल केला जाईल.
हेही वाचा…Truecaller वरून तुमचे अकाउंट अन् नंबर कसं Deactivate कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
नाझरो७० प्रो ५जी रेनवॉटर टच सपोर्टसह येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पावसामध्ये किंवा ओल्या हातांनीही तुम्ही हा स्मार्टफोन सहज वापरू शकता. ही फीचर्स यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झालेल्या रिअलमी १२ मालिकेतही होती आणि वनप्लस १२ मालिकादेखील अशाच Aqua Touch सपोर्ट फीचर्ससह लाँच करण्यात आली होती. त्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनला हात लावण्याची गरज नाही. फक्त हाताच्या इशाऱ्यांवर हा फोन कंट्रोल केला जाईल.
नाझरो७० प्रो ५जीची अपेक्षित किंमत आणि फीचर्स –
रिअलमीने नाझरो७० प्रो ५जी ॲण्ड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित कंपनीच्या रिअलमी यूआय ५.० वर चालण्याची अपेक्षा आहे. तसेच खास गोष्ट म्हणजे रिअलमी नाझरो७० प्रो ५जी सह bloatware मध्ये ६५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचे वचन देत आहे. रिअलमीने नाझरो७० प्रो ५जीची किंमत भारतात २५,००० पेक्षा कमी असणार आहे. कारण- त्याच्या पूर्ववर्ती नाझरो७० प्रो ५जीची किंमत भारतात २३,९९९ होती; असे सांगण्यात येत आहे