अलीकडेच लॉंच झालेल्या Realme Narzo 50 ची पहिली विक्री भारतात आजपासून सुरू होत आहे. ही विक्री आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. हा फोन अॅमेझॉन वरून तुम्हाला कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. Realme चा नवीन मिड-रेंज स्मार्टफोन MediaTek Helio G96 SoC वर चालतो आणि १२०Hz च्या रिफ्रेश दर आणि ६००nits पीक ब्राइटनेससह ६.६-इंचाचा IPS LCD डिस्प्ले वैशिष्ट्यीकृत करतो.

Realme Narzo 50 फोन तुम्हाला ५,०००mAh बॅटरीसह ३३W फास्ट चार्जिंग सपोर्ट देतो. Realme Narzo 50 मध्ये RAM विस्ताराची ऑफर आहे, जी ६GB RAM सह ११GB पर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड ११ द्वारे समर्थित आहे, ज्यावर Realme UI २.० ठेवण्यात आला आहे. तसेच Realme Narzo 50 हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी अॅमेझॉनद्वारे आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर्स आणि रिटेल स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध केला आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?

Realme Narzo 50 ची किंमत

Realme Narzo 50 हा फोन ४ जिबी+ ६४जिबी स्टोरेज असलेला मॉडेलची किंमत ही १२,९९९ रुपये इतकी आहे. तर ६जिबी + १२८ जिबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,४४९ रुपये आहे. हँडसेट स्पीड ब्लॅक आणि स्पीड ब्लू या कलरमध्ये तुम्हाला हा फोन उपलब्ध होणार आहे.

जाणून घ्या ही आकर्षक ऑफर

Realme Narzo 50 स्मार्टफोनवर दोन आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. ६ जिबी + १२८ जिबी स्टोरेज मॉडेल असलेल्या फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास १००० रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. त्याच वेळी, तुमच्यासाठी एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत, येथे तुम्हाला १२,६०० रुपयांची सूट मिळू शकते.

Realme narzo 50 ची वैशिष्ट्ये

Realme Narzo 50 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो, ज्यामध्ये ५०MP कॅमेरा, २MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि २MP मॅक्रो कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये १६MP सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS यांचा समावेश आहे.

Story img Loader