आपली अनेक कामे हल्ली स्मार्टफोनच्या मदतीने होतात. आपण आपले बजेट आणि आपल्याला हवे असणारे फीचर्स ज्यामध्ये असतील त्या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करत असतो. फीचर्समध्ये आपण स्टोरेज, आणि कॅमेरा तसेच बॅटरी यांचा परफॉर्मन्स तपासात असतो. अनेक कंपन्यांच्या फोनची तुलना आपण करतो आणि मगच कोणता फोन घ्यायचा हे ठरवतो. मात्र नुकताच iQOO ने Neo 7 Pro 5G हा आणि दुसरीकडे रिअलमीने आपला Narzo 60 Pro 5G फोन लॉन्च केला आहे. आज आपण या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कोणता फोन बेस्ट आहे ,त्याचे फीचर्स किंमत काय आहे हे पाहणार आहोत.
iQOO Neo 7 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला १२० Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी + रिझोल्युशन ऑफर करते. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट करतो. यामध्ये फोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर केले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FuntouchOS 13 वर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
रिअलमी Narzo 60 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
रिअलमी नाझरो ६० प्रो ५जी या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा कर्व्ह डिस्प्ले ऑफर करण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. हा फोन MediaTek Dimensity 7050 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच वापकर्त्यांना यामध्ये १२ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज वापरायला मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 वर चालतो.
iQOO Neo 7 Pro चा कॅमेरा
या फोनचा कॅमेरा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.
रिअलमी Narzo 60 Pro 5G चा कॅमेरा
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये १०० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जी OIS आणि २ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्सला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. तसेच ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ६७W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
iQOO Neo 7 Pro 5G
iQOO Neo 7 Pro 5G ची बॅटरी ८ मिनिटात ५० टक्के तर ३० मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होऊ शकते. यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी १२०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हेही वाचा : VIDEO: रिअलमीने भारतात लॉन्च केले ‘हे’ दोन स्मार्टफोन्स; डिस्काउंट मिळवायचा असल्यास…
iQOO Neo 7 Pro 5G किंमत आणि ऑफर्स
iQOO Neo 7 Pro 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपयांमध्ये करण्यात आली आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. ग्राहक हा फोन Fearless Flame (ऑरेंज) आणि Dark Storm (निळा) या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. तसेच या फोनची विक्री १५ जुलैपासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच तो कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल.
कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर खरेदीदारांना ICICI बँक आणि SBI बँक कार्डवर २ हजार रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल. तसेच दोन्ही मॉडेल्सवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.
रिअलमी Narzo 60 Pro ची किंमत
रिअलमी नाझरो ६० प्रो ५जी हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८/१२८ जीबीची किंमत २३,९९९ रुपये, १२/२५६ जीबीची किंमत २६,९९९ रुपय आणि १२/१ टीबीची किंमत २९,९९९ रुपये आहे.Realme Narzo 60 सीरिजचे प्री-बुकिंग सुरू झाले असून १४ जुलै रोजी संपणार आहे. विक्री ऑफरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास खरेदीदारांना प्री-ऑर्डर दरम्यान SBI आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर १,५०० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल. रिअलमी नाझरो ६० प्रो ५जी आणि रिअलमी नाझरो ६० ५जी या फोन्सची पहिली विक्री १५ जुलै रोजी Amazon आणि Realme च्या अधिकृत वेबसाईटवर होणार आहे.