रियलमी ९ प्रो सीरीजचे स्मार्टफोन लवकरच भारतात लॉंच होणार आहेत. ट्विटरवर माहिती शेअर करताना रियलमी इंडियाचे सीईओ माधव शेठ म्हणाले की, लवकरच भारतात ९ प्रो आणि ९ प्रो+ लॉंच केले जातील. हा फोन ५G तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. माहिती देताना ते म्हणाले की रियलमी ९ प्रो+ (Realme 9 Pro + ) आणि रियलमी ९ प्रो ९ (Realme 9 Pro 9) हे फोन रियलमी ९ आय (Realme 9i ) या सिरीजमध्ये समाविष्ट केले जातील.
रियलमी ९ आय हा ४G फोन असून यामध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. सीईओ म्हणाले की भारतात ५G फोन लॉंच करणारा रियलमी हा पहिला ब्रँड आहे आणि २०,००० रुपयांपेक्षा कमी श्रेणीत ५G फोन आणणारा तो पहिला ब्रँड आहे. अशी शक्यता आहे की हे दोन्ही फोन रियलमी ९ प्रो आणि रियलमी ९ प्रो+ देखील २०,००० रुपयांच्या खाली येऊ शकतात.
(हे ही वाचा: Jio vs Airtel: 2GB डेटा देणारा कोणता आहे बेस्ट प्लॅन? जाणून घ्या)
रियलमी ९ प्रो सीरीजची डिजाइन
रियलमीने ९ प्रो+ आणि ९ प्रो कोणत्या प्रकारचे ५G सपोर्ट देईल याबद्दल माहिती दिलेली नाही. पण हे फोन बजेटमध्ये आणले जाऊ शकतात. रियलमी ९ प्रो+ आणि ९ प्रोच्या लीक झालेल्या माहितीमुळे हे स्पष्ट होते की ते रियलमी ९ आय सारखेच दिसतात. हे डिझाइन स्वतः GT २ प्रो द्वारे प्रेरित आहे जे रियलमीने चीनमध्ये जानेवारीच्या सुरुवातीला लॉंच केले होते.
(हे ही वाचा: Reliance Jio चा नवीन रिचार्ज प्लॅन, मिळेल दैनंदिन २.५ GB डेटा आणि वर्षभराची वैधता)
स्पेसिफिकेशन
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, रियलमी ९ प्रो+ मध्ये MediaTek Dimensity 920 प्रोसेसर वापरला जाईल, तर Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर रियलमी ९ प्रोद्वारे समर्थित आहे. रियलमी ९ प्रो+ 90Hz रिफ्रेश रेटसह ६.४३ इंच फुल-HD+ सुपर AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो, तर रियलमी ९ प्रो 120Hz रिफ्रेश रेटसह ६.५९ इंचाचा LCD वापरू शकतो.
(हे ही वाचा: Jio vs Airtel: 2GB डेटा देणारा कोणता आहे बेस्ट प्लॅन? जाणून घ्या)
बॅटरी आणि कॅमेरा
रियलमी ९ प्रो+ वर ५० मेगापिक्सेल कॅमेरा प्रणाली उपलब्ध असू शकते, तर रियलमी ९ प्रो मध्ये ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. आणि शेवटी, अहवालानुसार, रियलमी ९ प्रो+ आणि रियलमी ९ प्रो 4500mAh आणि 5000mAh बॅटरी असू शकते.