सध्या स्मार्टफोन ही प्रत्येकाची महत्वाची गरज बनली आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपली अनेक कामे सोपी झाली आहेत. सध्या अनेक मोबाइल कंपन्यांनी आपले नवनवीन स्मार्टफोन बाजारामध्ये लॉन्च केले आहेत. मात्र जे वापरकर्ते ३० हजार रुपयांच्या आतमधील मिड रेंज श्रेणीमधील स्मार्टफोन शोधत आहेत त्यांच्यासाठी २०२३ हे वर्ष चांगले राहिले आहे असे म्हणता येईल.
३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र त्यामध्ये चांगली बॅटरी लाईफ देणाऱ्या फोनचा विचार केला असता काही निवड्क स्मार्टफोन्सचा समावेश त्यामध्ये होतो. आज आपण अशा ५ स्मार्टफोनविषयी जाणून घेणार आहोत ज्यांची किंमत ३० हजारांपेक्षा कमी आहे आणि ज्यामध्ये चांगली बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
सॅमसंग Galaxy F54
सॅमसंग Galaxy F54 यामध्ये ६,००० mAh क्षमतेची बॅटरी येते. हा स्मार्टफोन २०२३ मधील सर्वात चांगला बॅटरी लाईफ असणाऱ्यांपैकी एक आहे. हा एकदा चार्ज केला असता हा फोन दोन दिवस सुरू राहू शकतो. या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि १२० Hz चा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ इंटर्नल स्टोरेज येते. हा फोन Exynos 1380 SoC द्वारे समर्थित आहे.
iQOO Neo 7
iQOO Neo 7 या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच याला १२० W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनचा चार्जर १० मिनिटांमध्ये ५० टक्के बॅटरी चार्ज करू शकतो. iQoo Neo 7 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.७८ इंचाचा फुलएचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळतो. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २०.९ आहे. तर तर रीफ्रेश रेट १२० Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राफिक्ससाठी octa-core 4nm MediaTek Dimensity 8200 5G हा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ८ जीबी अँड १२ जीबी रॅमचा पर्याय ग्राहकांना आहे. तसेच यामध्ये १२८ जीबी आणि २५६ जीबी हे इनबिल्ट स्टोरेज असलेले मॉडेल्स येतात. याची रॅम २० जीबी पर्यंत वाढवता येते.
Poco F5
Poco F5 5G मध्ये ६७ W चे टर्बो चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच याला ५००० mAh ची बॅटरी मिळते. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत ही २९,९९९ रुपये इतकी आहे. हा या चार्ज होणार स्मार्टफोन नसला तरी देखील एकदा चार्ज केला असता याची बॅटरी एक दिवस टिकते. पोकोचा नवीन फोन लकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसरसह येतो. यामध्ये ८ जीबीची LPDDR5X रॅम देण्यात आली आहे. ७ जीबी वर्च्युअल रॅमसह RAM १९ जीबी पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये २५६ जीबीचे UFS 3.1 स्टोरेज मिळते. या फोनमध्ये चेंबर कूलिंग सिस्टीम देखील मिळते.
हेही वाचा : VIDEO: Poco ने लॉन्च केला ४५ मिनिटांत चार्ज होणारा ‘हा’ तगडा स्मार्टफोन, किंमत फक्त…
OnePlus Nord 2T
OnePlus Nord 2T मध्ये वापरकर्त्यांना ४,५०० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. एकदा चार्ज केल्यास या फोनची बॅटरी एक दिवस टिकू शकते. या बॅटरीला ८०W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. यामध्ये तुम्हाला ६.४३ इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा एक कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आहे. जर का तुम्ही चांगली बॅटरी लाईफ असणारा कॉम्पॅक्ट मिड रेंज स्मार्टफोन शोधात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला फोन आहे.
Realme 11 Pro+
जर का तुम्हाला चांगली बॅटरी लाईफ आणि प्रीमियम डिझाईन असणारा स्मार्टफोन शोधात असाल तर रिअलमी ११ प्रो प्लस हा एक आणखी चांगला स्मार्टफोन आहे. जॅमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तर १०० W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. यामध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. एकदा चार्ज केला असता एक दिवस याची बॅटरी टिकू शकते. यामध्ये तुम्हाला १२ जीबी रॅम आणि २५६ इंटर्नल स्टोरेज मिळते.