Fake WhatsApp Calls: सोशल मीडियामुळे जग जवळ आलं आहे असे म्हटले जाते. याच्या वापरामुळे लोक डिजिटल स्वरुपात एकमेकांच्या जवळ आले आहेत. पण या माध्यमामुळे काही वाईट गोष्टी देखील घडत आहेत. सोशल मीडियाचा वापर करुन सर्वसामान्यांना फसवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेनदिवस वाढत आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी डिजिटल चोर निरनिराळे उपाय करत असल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून व्हाट्सअ‍ॅपवर अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन कॉल, मेसेज येण्याबाबत तक्रार वाढल्या आहेत. व्हाट्सअ‍ॅपवर +254, +84, +63 या क्रमांकांनी सुरुवात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नंबरवरुन फोन किंवा मेसेज आल्यावर तो नंबर Report And Block करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

गृह मंत्रालयाच्या Indian Cybercrime Coordination Center (I4C) द्वारे याबाबतीमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. सामान्य जनता सायबर क्राईमला बळी पडू नये यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. डेटा अ‍ॅनालिस्ट अ‍ॅंड फोरेंसिक विभागातील तज्ज्ञ सायबर हल्ला रोखण्यासाठी सरकारला मदत करत असतात. या विभागातील तज्ज्ञांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, हे आंतरराष्ट्रीय नंबर सिंगापूर, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशाचे आहेत. या नंबरवरुन आलेला कॉल उचलल्यावर आपला फायनॅशियल डेटा समोरची व्यक्ती चोरी करु शकते. जर यात अडकून तुमची फसवूणक झाली असेल तर तुम्ही cybercrime.gov.in वर जाऊन तक्रार करु शकता.

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
Commissioner Dr Indurani Jakhar instructed department heads to set office hours for listening to citizens complaints
नागरी समस्या, तक्रारी ऐकून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
Image of L&T Chairman
“किती वेळ पत्नीकडे पाहत बसणार…” L&T च्या अध्यक्षांचा कर्मचाऱ्यांना रविवारीही काम करण्याचा सल्ला, सोशल मीडियावर उठली टीकेची राळ

भारतीयांवर होतोय सायबर हल्ला

सायबर इंटलिजन्स अ‍ॅंड डिजिटल फोरेंसिक या विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ANI ला सांगितले की, हा एक नव्या पद्धतीचा सायबर क्राइम ट्रेंड आहे. संपूर्ण भारतातील लोकांना व्हाट्सअ‍ॅपवर +254, +84, +63, +1 (218) यांसारख्या अन्य आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन कॉल किंवा मेसेज येत आहेत. या कॉल आणि मेसेजना प्रतिसाद देणारे बहुसंख्य सायबर क्राइमचे शिकार बनले आहेत. अशा प्रकारे होणाऱ्या फसवणूकीमध्ये दररोज वाढ होत आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याने आंतरराष्ट्रीय नंबरवरुन कॉल किंवा मेसेज आल्यावर ते नंबर रिपोर्ट आणि ब्लॉक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनुसार, हे कॉल आणि मेसेज सकाळी ६-७ वाजल्यापासून ते रात्री कधीही येऊ शकतात. सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते तरुण मुलांपर्यंत कोणत्याही गटातील/ वर्गातील नागरिकांना हे फेक कॉल येत आहेत.

National Technology Day: तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ५८०० कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ, जाणून घ्या…

कॉल उचलल्यावर /मेसेज आल्यावर काय होते?

+243 ने सुरु होणाऱ्या एका नंबरद्वारे पाठवण्यात आलेल्या एका मेसेजमध्ये “नमस्कार, माझ नाव अलीना आहे. मला तुमची काही मिनिटं मिळतील का?” असे लिहिले होते. त्यात पुढे “सध्या 5G इंटरनेटचे युग आहे. लोक इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमावत आहेत. तुम्हालाही हे ठाऊक असेल. पैसे कमावण्यासाठी तुम्ही मला जोडले जाऊ शकता. मला आशा आहे की, तुम्ही माझ्या या मेसेजला नक्की रिप्लॉय द्याल.” असे लिहिले होते.

Story img Loader