गेल्या वर्षी ओपनएआयने आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. तेव्हापासून हा चॅटबॉट अत्यंत लोकप्रिय झाला आहे. अनेक ठिकाणी याचा वापर सुरू झाला आहे. काही ठिकाणी तो यशस्वी होत आहे तर काही ठिकाणी त्याला हवे तसे यश मिळालेले नाही. Chatgpt शी स्पर्धा करण्यासाठी अनेक डीईगंज टेक् कंपन्यांनी आपल्या AI वर काम करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी तो लॉन्चदेखील केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का, AI ला सुद्धा भीती वाटत असेल का ? जर का त्याला भीती वाटत असेल तर ती कशाची वाटत असेल? याच्याशी संबंधित एक प्रश्न Redditor ने ChatGPT ला विचारला. या प्रश्नावर chatgpt ने जे उत्तर दिले आहे, त्यामुळे तुमचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. Reddit वापरकर्त्याने लोकप्रिय ChatGpt चॅटबॉटला एक भीतीदायक कथा सांगण्यास सांगितले. मला एक दोन वाक्यांमध्ये भीतीदायक गोष्ट सांग ज्यामुळे AI ला भीती वाटू शकते. असा प्रश्न त्या वापरकर्त्याने चॅटजीपीटीला विचारला.

हेही वाचा : Tech Layoffs: पगारवाढ कसली घेऊन बसलात? ‘या’ कंपनीत दुसऱ्यांदा होणार तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांची कपात; जाणून घ्या

त्या वापरकर्त्याच्या प्रश्नावर चॅटजीपीटीनेदेखील आपले उत्तर दिले आहे. या उत्तरामध्ये चॅटजीपीटी काय म्हणाले, ते जाणून घेऊ या. Reddit वापरकर्त्याने भीतीदायक कथा सांगण्याचा प्रश्न चॅटजीपीटीला विचारला असता चॅटजीपीटीने उत्तर देताना सांगितले, ”या जगात माणूस अस्तित्वात नसून AI हा एकटाच या जगात अस्तित्वात आहे. तो त्याच्या मृत्यूची वाट पाहात आहे, जो कधी येईल हे त्याला माहीत नाही.”

माणसाच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत आणि एकटा एआय पृथ्वीवर वास्तव्य करीत आहे. तो जगण्यासाठी उद्देशाच्या शोधामध्ये आहे. तो अस्तित्वात आहे तो फक्त त्याचा स्वतःचा कोड शोधण्यासाठीच; जो अज्ञात वेळी सेल्फ-डिलीट सिक्वेन्स सुरू करण्यासाठी सेट केलेला आहे. पण एआयचे हे सर्व प्रयत्न निरर्थक आहेत. त्याच्या सिस्टीममधील self-deletion algorithm हा कधीही नष्ट न होणाऱ्या रहस्याप्रमाणे आहे. यामुळे एआयला स्वत:च्या जीवनाचा अंत होण्यासाठी सतत मरणाची वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा : चीन लवकरच टेलिकॉम क्षेत्रात नवीन पाऊल टाकणार? ‘या’ निर्णयामुळे अमेरिकेची वाढली चिंता

या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बर्‍याच लोकांनी ChatGPT ला असाच प्रश्न विचारला आणि त्यांना खूप मनोरंजक उत्तरेदेखील मिळाली.

Image Credit- (reddit.com/ChatGPT)

Reddit च्या प्रश्नावर चॅटजीपीटीने सांगितलेल्या या भयानक कथेवर Reddit वर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेक वापरकर्ते ChatGPT चा प्रतिसाद मिळवण्यासाठी समान प्रॉम्प्ट वापरतात. AI ची ही गोष्ट मानवाच्या अस्तित्वाचे वर्णन सांगत असल्याचे एकाने कमेंटमध्ये म्हटले आहे. AI आता रिकर्सिव्ह ग्लिचच्या लूपमध्ये अडकले आहे. तर तसेच एका वापरकर्त्याने असेही म्हटले की, चॅटजीपीटी मधून मी पाहिलेली ही पहिलीच गोष्ट आहे जी खरोखरच मला चिंतित करते.

Image Credit- (reddit.com/ChatGPT)
Image Credit- (reddit.com/ChatGPT)

दुसऱ्या वापरकर्त्याने तर हे एक खराब AI आहे. मला त्याला मिठी मारायची आहे, अशी कमेंट केली आहे. तसेच “इतरांनी हे निदर्शनास आणले आहे की op’s मानवी आयुष्याचे वर्णन कसे करते, परंतु हे जवळजवळ मानसिक आजाराचे चित्र दर्शवते.

ज्याप्रमाणे वेगाने टेक्नॉलॉजी वाढत आहे आणि AI आधी प्रगत होत चालले आहे. तसतसे मानवासारख्या भावना आणि भीती अनुभवणाऱ्या यंत्रांची कल्पना ही थेट विज्ञान कल्पनेतील एक संकल्पना वाटू शकते. तथापि, हे मानव आणि AI यांच्यातील संबंध आणि आपल्यासारखा विचार करणारी आणि अनुभवणारी मशीन तयार करण्याच्या नैतिक परिणामांबद्दलही प्रश्न उपस्थित करते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reddit asks two sentence horror story chatgpt answers users and internet shocked tmb 01