स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने भारतीय बाजारात परवडणाऱ्या किमतीत Redmi 10 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने १०,९९९ मध्ये Redmi 10 लॉन्च केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी दिली जात आहे. मात्र, या फोनचे स्पर्धक आधीच बाजारात आहेत. ज्यामध्ये Realme Narzo 50A आणि Samsung Galaxy M21 सारखे फोन आहेत.

यापैकी कोणता फोन तुमच्यासाठी चांगला असू शकतो, ते जाणून घेऊया. या तीन फोनचे स्पेसिफिकेशन, किंमत आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या माहितीच्या आधारे तुम्हाला यातील कोणता बजेट फोन बेस्ट आहे, हे समजण्यास मदत होईल.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 kartik aaryan starr movie lead over ajay devgn starr movie on third saturday
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
What Are Movable And Immovable property
Movable And Immovable Property : स्थावर व जंगम मालमत्ता म्हणजे नेमके काय? या दोन मालमत्तांतील फरक काय? जाणून घ्या, कायदा काय सांगतो?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती? जन्मराशीनुसार तुम्हाला पावणार आज भगवान विष्णू व देवी लक्ष्मी; वाचा राशिभविष्य
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स

या स्मार्टफोन्सची किंमत
या रेंजमधीस सर्वात कमी किमतीचा फोन Redmi 10 आहे, जो तुम्ही १०,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. त्याच वेळी, Realme Narzo 50A ११,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. तर Samsung Galaxy M21 2021 हा फोन १२,९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.

आणखी वाचा : बीएसएनएलचा ३६५ दिवसांचा ‘हा’ सर्वात स्वस्त प्लॅन, मिळणार १२० जिबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंग, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

डिस्प्ले
Redmi 10 मध्ये ६.७१ इंच (1600 x 720 pixels) HD + डिस्प्ले आहे. तसंच Realme Narzo 50A मध्ये ६.५ इंच (1600 x 720 पिक्सेल) HD + आणि Samsung Galaxy M21 2021 एडिशन फोनमध्ये ६.४ इंच (2340 x 1080 पिक्सेल) फुल HD + दिलेला आहे.

प्रोसेसर
Redmi 10 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चांगला प्रोसेसर देण्यात आला आहे. दुसरीकडे, तुम्हाला Realme Narzo 50A मध्ये MediaTek Helio G85 आणि Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये Exynos 9611 प्रोसेसर मिळेल.

आणखी वाचा : Xiaomi 12 सीरिजमधील ३ धाकड फोनवरून अखेर पडदा उठला, ५० MP चा मिळतोय कॅमेरा

कॅमेरा
Redmi 10 मध्ये 5MP सेल्फी कॅमेरा आहे, तर Realme Narzo 50A, 8MP आणि Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये 20MP फ्रंट कॅमेरा आहे. मागील कॅमेरामध्ये Redmi मध्ये 50MP + 2MP, Realme Narzo मध्ये 50MP + 2MP + 2MP आणि सॅमसंगमध्ये 48MP + 8MP + 2MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi मध्ये दोन RAM पर्याय आहेत
तुम्हाला Redmi 10 4GB/6GB ऑप्शनमध्ये मिळेल. तर Realme Narzo 50A फक्त 4GB आहे आणि Samsung Galaxy M21 2021 मध्ये देखील 4GB रॅमचा पर्याय आहे. सर्व तीन फोन स्टोरेजमध्ये 64GB/128GB ऑप्शन देण्यात आले आहेत.

बॅटरी आणि फास्ट चार्जिंग
Redmi 10 मध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 6000 mAh बॅटरी आहे. Realme Narzo 50A मध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 6000 mAh बॅटरी देखील आहे. Samsung Galaxy M21 2021 एडिशनमधील 6000 mAh बॅटरी 15w च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

ऑपरेटिंग सिस्टम आणि कलर ऑप्शन
Redmi 10 आणि Realme Narzo 50A Android 11 द्वारे समर्थित आहेत, तर Samsung Galaxy M21 2021 वर्जन Android 10 वर चालते. कलर व्हेरिएंटमध्ये, Redmi 10 पॅसिफिक ब्लू, कॅरिबियन ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅकमध्ये येतो. तर, Realme Narzo 50A ऑक्सिजन ग्रीन आणि ऑक्सिजन ब्लूमध्ये उपलब्ध आहे. तर Samsung Galaxy M21 2021 एडिशन आर्क्टिक ब्लू आणि चारकोल ब्लॅक ऑफर करते.