रेडमीने भारतात नवीन मोबाइल Redmi 11 Prime 5G फोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे की Redmi 11 Prime 5G फोन भारतात ६ सप्टेंबर रोजी लाँच होईल. मिडीयाटेक डायमेंसिटी ७०० च्या सामर्थ्याने सुसज्ज असलेला, हा स्मार्टफोन कमी किमतीत बाजारात लाँच केला जाईल जो उत्कृष्ट वैशिष्ट्यांना सपोर्ट करेल.
Redmi 11 Prime 5G भारतात ६ सप्टेंबर रोजी लाँच होईल. कंपनीच्या वतीने Xiaomi इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर या फोनचे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे, ज्यामध्ये फोनच्या फोटोसह अनेक महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स शेअर केले आहेत. अशी चर्चा आहे की ६ सप्टेंबर रोजी Redmi 11 Prime 5G सोबत इतर मॉडेल देखील सादर केले जाऊ शकतात. Redmi 11 Prime 5G 6 सप्टेंबर रोजी लाँच झाल्यानंतर काही दिवसांत भारतात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.
( हे ही वाचा: Jio AirFiber: आता वायरशिवाय रॉकेट स्पीडवर मिळेल 5G Internet; जाणून घ्या कसे करेल काम)
Redmi 11 Prime 5G
सर्वप्रथम, फोनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi 11 Prime 5G फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच केला जाईल, ज्यामध्ये अरुंद भागासह बेझल-लेस स्क्रीन आहे. फोनच्या मागील पॅनलच्या वरच्या उजव्या बाजूला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये कॅमेरा लेन्स मोठ्या गोल आकारात बसवण्यात आला आहे. मागील पॅनेल पूर्णपणे सपाट नाही आहे तर थोडा खडबडीत बनवण्यात आलाय. त्याच वेळी, मागील भागावर दुसरा कोणताही सेन्सर दिलेला नाही.
Redmi 11 Prime 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलताना Xiaomi ने खुलासा केला आहे की हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट वर लाँच केला जाईल. फोनमध्ये दोन सिम असतील आणि दोन्हीवर ५जी चालवता येईल. फोटोग्राफीसाठी, जिथे हा मोबाइल फोन ५० मेगापिक्सेलच्या मागील कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल, तिथे पॉवर बॅकअपसाठी ५०००एमएएच बॅटरी दिली जाईल. Redmi 11 Prime 5G फोनच्या डिस्प्ले आणि इतर कॅमेरा सेन्सर्सची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याच वेळी, अशी अपेक्षा आहे की हा रेडमी मोबाइल दोनपेक्षा जास्त रॅम प्रकारांमध्ये प्रवेश घेऊ शकतो.