सध्या स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. लोकांची बरीचशी कामे ही सध्या मोबाइलच्या मदतीने पूर्ण होतात. त्यात ऑनलाइन पेमेंट असे, जेवण ऑर्डर करणे, तिकीट बुक करणे अशा अन्य अनेक कामाचा समावेश आहे. देशात सध्या अनेक लोकप्रिय मोबाइल कंपन्या आहेत. ज्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असतात. आज आपण ऑगस्ट २०२३ या महिन्यात कोणकोणते फोन ग्राहकांसाठी लॉन्च होणार आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज आपण चांगले फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, कॅमेरा आणि बॅटरी तसेच स्टोरेज आणि रॅम असलेले फोन पाहणार आहोत. ज्याची किंमत ही १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. याबाबतचे वृत्त इंडिया Today ने दिले आहे.

हेही वाचा : Paytm ने लॉन्च केलेले ‘हे’ साउंडबॉक्स ठरणार व्यापाऱ्यांसाठी गेमचेंजर, फोन कनेक्ट करून ऐकू शकता गाणी

Redmi 12 5G

Redmi 12 5G हा फोन रेडमीच्या बजेट स्मार्टफोन लाइनअपमधील एक फोन आहे. याची किंमत १०,९९९ रुपयांपासून सुरू होते.Redmi 12 5G तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ४/१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. ६/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे. तर ८/२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आहे. या किंमती बँकेच्या ऑफरसह आहेत. हे फोन जेड ब्लॅक, पेस्टल ब्लू आणि मूनस्टोन सिल्व्हर कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. चिपसेटसाठी रेडमी १२ ५जी स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 SoC द्वारे समर्थित आहे. तर रेडमी १२ ४जी MediaTek Helio G88 12nm प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. तर ५जी मॉडेलमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर करते.

सॅमसंग Galaxy M14 5G

सॅमसंग गॅलेक्सी M14 5G ही परवडणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे. यामध्ये ९० Hz चा एलसीडी डिस्प्ले मिळतो. यामध्ये इमर्सिव्ह व्हिज्युअल अनुभवाची खात्री मिळते. M14 मध्ये ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे माध्यम वापरामध्ये हा फोन आपण जवळपास दोन दिवस वापरू शकतो. स्मार्टफोनचा जास्त वापर करणारे लोकही एका चार्जिंगवर किमान दिवसभर हा फोन वापरू शकतात. जर तुम्ही दीर्घकाळ बॅटरी टिकणाऱ्या फोनच्या शोधात असाल तर हा फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्रोसेसरमध्ये ४GB रॅम आणि १२८ GB तसेच ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज सपोर्ट उपलब्ध आहे. फोनची इंटरनल मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते असे म्हटले जात आहे. Samsung Galaxy M14 5G ची भारतात ४GB/१२८ GB साठीची किंमत १३,४९० रुपयांपासून सुरू होते. ६GB/१२८ GB सह टॉप-एंड मॉडेल तुम्हाला १४,९९० रुपयांपर्यंत मिळू शकतो. त्यामुळेच १५ हजारांच्या खालच्या श्रेणीमध्ये स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा : VIDEO: १० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झाला MotoRola चा १२८ जीबी स्टोरेजचा दमदार स्मार्टफोन

Realme Narzo N53

Realme कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने आपला Narzo N53 हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Realme Narzo N53 हा कंपनीचा सर्वात स्लिम फोन असल्याचे कंपनीचा दावा आहे.Realme Narzo N53 मध्ये तुम्हाला ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. ब्राईटनेस ४५० नीट्स इतका आहे. हा स्मार्टफोन Octa Core Unisoc T612 SoC वर काम करतो. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. या फोनला ६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. रिअलमीचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 काम करतो. रिअलमीच्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. ज्याला AI चा सपोर्ट देखील मिळतो. दुसऱ्या लेन्सबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Realme Narzo N53 मध्ये ५०००mAh ची बॅटरी मिळते. ज्याला ३३ W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळते.

Realme Narzo N53 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. ग्राहकांना हा रिअलमीचाही फोन खरेदी करताना HDFC बँकेच्या कार्डने व्यवहार केल्यास अतिरिक्त १,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi 12 5 realme nazro n53 and samsaung galaxy m14 best smartphones under 15000 tmb 01
Show comments