Redmi ही एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. शाओमी कंपनीने भारतात आज दोन नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Redmi 12 5G आणि Redmi 12 4G या दोन फोन्सचा समावेश आहे. चिपसेट सोडून दोन्ही फोनमद्ये एकसारखेच स्पेसिफिकेशन येतात. तसेच या दोन्ही फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेटअप , ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ९० Hz रिफ्रेश रेट असलेला ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. Redmi 12 4G हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे. तर ५ जी मॉडेल Amazon India वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Redmi 12 5G, Redmi 12 4G : स्पेसिफिकेशन्स
Redmi 12 दोन पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात रेडमी १२ ४जी णिरेडमी १२ ५जी चा समावेश आहे. या दोन फोन्समध्ये फक्त चिपसेटमध्ये फरक असणार आहे.
दोन्ही मॉडेल्समध्ये ६.७९ इंचाचा FHD+ आणि ९० Hz एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत ४जी आणि ५जी मॉडेल्समध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. रेडमी १२ ५जिनांनी रेडमी ४जी मध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच दोन्ही फोन्सना १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
चिपसेटसाठी रेडमी १२ ५जी स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 SoC द्वारे समर्थित आहे. तर रेडमी १२ ४जी MediaTek Helio G88 12nm प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. ४जी मॉडेलमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज ऑफर करण्यात आले आहे. तर ५जी मॉडेलमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर करते.
Redmi 12 5G, Redmi 12 4G : भारतातील किंमत आणि सेल ऑफर्स
Redmi 12 4G भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ४/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ८,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. ६/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रुपये आहे.
हेही वाचा : सॅमसंग लवकरच लॉन्च करणार ‘Galaxy Ring’; जाणून घ्या काय असणार खास फीचर्स
Redmi 12 5G तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ४/१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. ६/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे. तर ८/२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आहे. या किंमती बँकेच्या ऑफरसह आहेत. हे फोन जेड ब्लॅक, पेस्टल ब्लू आणि मूनस्टोन सिल्व्हर कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत.