रेडमीने आपला नवीन परवडणारा स्मार्टफोन ‘Redmi A1+’ भारतात लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी रेडमीने भारतीय बाजारात आपल्या ‘ए’ सीरीज अंतगर्त Redmi A1 स्मार्टफोन लाँच केला होता. नुकतेच Redmi A1+ चा टीझर रिलीज करताना कंपनीने हा स्मार्टफोन अनेक फीचर्सने सुसज्ज असेल, असे सांगितले आहे.
Redmi A1+ फीचर्स
‘Redmi A1+’चे फीचर ‘रेडमी वन’ प्रमाणेच आहेत. हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल जो वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले तसेच ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनचं प्रोडक्ट पेज देखील लाइव्ह करण्यात आलं आहे.‘Redmi A1+’मध्ये रियर माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर हे एक्स्ट्रा फीचर देण्यात आले आहे. लीक्स झालेल्या माहितीनुसार, हा रेडमी मोबाईल २०:९ अॅस्पेक्ट रेशियोवर सादर केला जाईल जो १६०० x ७२० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५२ इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करेल. ही स्क्रीन १२०हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट तसेच ४०० निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करेल.
आणखी वाचा : परवडणाऱ्या दरात Lava कंपनीने बाजारात दाखल केला ‘हा’ नवीन स्मार्टफोन; ३ जीबी रॅमसह आणखी मिळेल बरचं काही…
फोनमध्ये २ जीबी रॅमसह ३२ जीबी स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवता येते. Redmi A1 सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स ८ मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स AI आहे. Redmi A1 च्या फ्रंटला ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi A1+ अँड्रॉइड १२ वर लाँच होईल, ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो ए२२ चिपसेट मिळेल. हा स्मार्टफोन ड्युअल सिम, ब्लूटूथ ५.० तसेच २.४ गीगाहर्ट्ज वायफायला सपोर्ट करेल.
पावर बॅकअपसाठी Redmi A1+ मध्ये १० वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली ५,०००एमएएच बॅटरी मिळू शकते. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन काळा, लाइट निळा, आणि लाइट हिरवा या रंगामध्ये उपलब्ध आहे.
Redmi A1+ ची किंमत
Redmi A1+ ची किंमत ६,९९९ रुपये पासून सुरू होते. हा फोन ३ जीबी+ ३२ जीबी आवृत्तीमध्ये देखील येतो ज्याची किंमत ७,९९९ रुपये आहे. हा हँडसेट देशात Flipkart, Mi.com, Mi Home स्टोअर्स आणि Xiaomi च्या किरकोळ भागीदारांद्वारे १७ ऑक्टोबरपासून रात्री १२ वाजता खरेदीसाठी उपलब्ध होईल.