Redmi A5 Launched In India : स्मार्टफोन घ्यायचा म्हणजे सगळ्यात आधी बजेट सेट करावा लागतो. मोबाईलसाठी जास्तीत जास्त आपण १० ते २० हजार रुपयांपर्यंतचे बजेट ठरवतो. त्यातसुद्धा आपण एखादी ऑफर किंवा डिस्काउंटच्याही शोधात असतो. तर तुम्हीसुद्धा सहा हजार रुपयांपर्यंत मोबाईल घेण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने भारतात रेडमी ए ५ (Redmi A5) स्मार्टफोन आता अधिकृतपणे लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले आणि युनिसन चिपसेट आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो आणि त्याला ५,२०० एमएएच बॅटरीचा आधार आहे.

रेडमी ए५ हा ३ जीबी+६४ जीबी आणि ४ जीबी+१२८ जीबी या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत ६,४९९ रुपये आणि ७,४९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, एमआय डॉट कॉमवर ऑनलाइन आणि देशातील अधिकृत रिटेल दुकानांमध्ये ऑफलाइन उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन पँडिचेरी ब्लू, जस्ट ब्लॅक, लेक ग्रीन या रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.

रेडमी ए ५ (Redmi A5)

रेडमी एएस मध्ये ६.८८ इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२० x १६८० पिक्सेल आहे आणि तो १२० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट देतो. डिस्प्लेमध्ये TÜV राईनलँड सर्टिफाईड आय प्रोटेक्शनदेखील आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर युनिसॉक T7250 चिपसेट आणि 4GB पर्यंत रॅम आहे. हा स्मार्टफोन 2TB पर्यंतच्या 64GB आणि 128GB दोन स्टोरेज पर्यायांमध्ये मिळू शकतो. युजर्स मायक्रोएसडी कार्ड जोडून स्टोरेज आणखी वाढवू शकतात.

हा स्वस्त रेडमी स्मार्टफोन अँड्रॉइड १५ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. स्मार्टफोनला २ वर्षांसाठी अँड्रॉइड ओएस अपडेट आणि चार वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेट्स, स्मार्टफोनमध्ये f/२.० अॅपर्चरसह ३२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेकंडरी कॅमेरा आणि f/२.० अपर्चरसह ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच Redmi A5 मध्ये ५,२०० mAh बॅटरी आहे, जी १५W चार्जिंग सपोर्टसह येते. स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.