Redmi ही एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन सादर करत असते. त्यामध्ये कंपनी ग्राहकांना फोन वापरत असताना चांगला अनुभव मिळावा म्हणून त्यामध्ये नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स देत असते. कंपनीने आपला आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन लॅान्च केला आहे. रेडमीने आपला Redmi Note 12R Pro हा स्मार्टफोन लॅान्च केला आहे. या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Redmi Note 12R Pro 5G लॉन्च झाल्यामुळे रेडमीच्या नोट १२ या सिरिजमध्ये आणखी एक फोनची एंट्री झाली आहे. या सिरिजमध्ये याआधी Redmi Note 12 5G, Redmi Note 12 4G, Redmi Note 12 Pro 5G, Redmi Note 12 Pr+ 5G आणि Redmi Note 12 Turbo सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. Redmi Note 12R Pro 5G मध्ये Snapdragon 4 Gen 1 हा प्रोसेसर देण्यात आला आहे.

हेही वाचा : Flipkart Big Saving Days sale: iPhone 13 वर मिळणार भरघोस डिस्काउंट; ‘इतकी’ असू शकते किंमत

Redmi Note 12R Pro 5G चे फीचर्स

Redmi Note 12R Pro 5G मध्ये वापरकर्त्यांना ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका आहे. डिस्प्लेचा ब्राईटनेस हा १२०० नीट्स इतका आहे. यामध्ये १२ जीबी LPDDR4X रॅम आणि २५६ जीबी UFS 2.2 स्टोरेज मिळते. यामध्ये अँड्रॉइड १३ वर आधारित MIUI १४ मिळते.

Redmi Note 12R Pro 5G चा कॅमेरा

Redmi Note 12R Pro 5G या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स असणार आहे. दुसरी लेन्स हे २ मेगापिक्सलची आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. त्याला ३३ W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच फोनमध्ये सेफ्टीसाठी तुम्हाला माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, ड्युअल-बँड वाय-फाय, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, ड्युअल सिम, ब्लूटूथ v5.1, GPS, 3.5mm ऑडिओ, USB टाइप-सी पोर्ट हे फीचर देण्यात अले आहेत.

हेही वाचा : Vodafone-Idea युजर्सना मोठा धक्का! सहा महिन्यांची वैधता असणारा ‘हा’ जबरदस्त प्लॅन केला बंद

Redmi Note 12R Pro 5G ची किंमत

Redmi Note 12R Pro 5G हा फोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ज्याची किंमत १,९९९ चिनी युआन (२३,७०० रुपये) इतकी आहे. हा फोन Black. gold आणि white या तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात हा फोन कधी लॉन्च होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi launch redmi note 12 pro 5g smartphone with 48 mp camera and 5000 mah battery check details tmb 01
Show comments