Redmi ही एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. असेच दोन स्मार्टफोन्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. Redmi ने Note 12 4G आणि Redmi 12C हे दोन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे फोन्स तुम्ही कुठून खरेदी करू शकता आणि याचे फीचर्स व किंमत काय असेल हे जाणून घेऊयात.

Redmi 12C चे फीचर्स

या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७१ इंचाचा HD+ डिस्प्ले मिळणार आहे. ज्यामध्ये ६० Hz चा रिफ्रेश रेट मिळणार आहे. तसेच वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझोल्युशन हे १६००×७२० इतके आहे. तसेच तुम्हाला यामध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला १०W चा चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि माइक्रोयूएसबी पोर्टसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

हेही वाचा : Google ची एक चूक अन् भरावा लागणार १,३३८ कोटींचा दंड; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

या फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट येतो. याची रॅम ५ जीबी पर्यंत वाढवता येते. यामध्ये रिअर माउंटेड हे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे. तसेच IP52 स्प्लैश-रेस्सिटेंट सारखे फिचर देण्यात आले आहे. फोनमध्ये तुम्हाला ड्युअल रिअर कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दुसरी लेन्स ही २ मेगापिक्सलची आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 12 4Gचे फीचर्स

रेडमीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा FFHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये गोरिला ग्लासचे लेयर दिले आहे. तसेच बॅटरी ५००० mAh ची असून त्याला ३३ W चे फास्ट चार्जिंग मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-सी पोर्टसारखे फीचर देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Unacademy करणार चौथ्यांदा कर्मचाऱ्यांची कपात; सीईओ म्हणाले, “सध्याची परिस्थिती…”

वापरकर्त्यांना या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमरी लेन्स ही ५० मेगापिक्सलची आहे. दुसरी मेगापिक्सलची अल्टरवाईड अँगल लेन्स आहे. तिसरी लेन्स ही २ मेअपीलक्सची मॅक्रो सेन्सर लेन्स आहे. हा फोन Android 13 वर काम करतो जो MIUI 14 वर आधारित आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये 2G, 3G, 4G, Dual SIM, Wi-Fi 2.4GHz, 5GHz, Bluetooth 5.0, NFC, IR Blaster, 3.5mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Redmi Note 12 4G आणि Redmi 12C फोनच्या किंमती

Redmi Note 12 4G हा फोन भारतामध्ये लॉन्च झाला असून याची किंमत १४,९९९ रुपये इतकी आहे. या किंमतीमध्ये हा फोन ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजमध्ये येतो. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे. बँकेच्या काही ऑफर्सनंतर अनुरमे हे फोन तुम्हाला १३,९९९ आणि १५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत. तसेच हा फोन तुम्ही Sunrise Gold, Ice Blue आणि Lunar Black या रंगांमध्ये खरेदी करू शकता.

Redmi 12C हा सुद्धा स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला आहे. यामधील ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ८,९९९ रुपये असणार आहे. तर ६जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ही १०,९९९ रुपये इतकी आहे. बँकेच्या ऑर्समध्ये यावर ५०० रुपयांची तुम्हाला हे फोन अनुक्रमे ८,४९९ आणि १०,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच हा स्मार्टफोन तुम्ही Matte Black, Mint Green, Royal Blue आणि Lavender Purple या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता.

रेडमीने लॉन्च केलेल हे दोन्ही स्मार्टफोन्स ६ एप्रिलपासून दुपारी १२ वाजल्यापासून १२ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तुम्ही हे फोन्स Flipkart, Amazon, Mi वेबसाइट, Mi Home स्टोअर्स आणि रिटेल शॉप्समध्ये खरेदी करू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा जुने डिव्हाईस एक्सचेंज कराल तेव्हा Xiaomi चाहत्यांना ५०० रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जाणार आहे.