गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन वापरकर्ते ज्या दिवसाची वाट बघत होते, ती घटीका समीप आली आहे. Redmi Note 11T 5G ३० नोव्हेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने याबाबतची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन रेडमी नोट सीरिजचा भाग आहे. रेडमी नोट 11 सीरिजचे चीनमध्ये तीन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. त्यात रेडमी 11, रेडमी नोट 11 प्रो आणि रेडमी नोट 11 प्रो प्लस आहे. मात्र भारतात रेडमी नोट 11 टी ५जी लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन रेडमी नोट 11 5जीचा रिब्रांड व्हर्जन आहे. यात 5 जी फीचर, जूमस्टर प्रोसेसर, फास्ट चार्जिंग, स्विफ्ट डिस्प्ले आणि रॅम बुस्टर फीचर आहेत. त्याचबरोबर याचा लूक आणि शार्प कॅमेरा लक्ष वेधून घेत आहे.
रेडमी नोट 11 टी 5 जी किमतीबाबत अजूनही माहिती नाही. मात्र मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार याच्या बेस व्हेरिएंटची किंमत १७,९९९ पासून सुरु असेल. तर टॉप मॉडेलची किंमत १९,९९९ इतकी असू शकते.
- रेडमी नोट 11टी 5जी स्मार्टफोन नावाप्रमाणेच 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो.
- फोन फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि रॅम बुस्टर फिचरसह आहे.
- अधिकृत वेबसाईटवर स्मार्टफोन चंदेरी आणि हिरव्या रंगात दाखवला गेला आहे.
- बेस मॉडेलमध्ये ६४ जीबी स्टोरेज दिलं गेलं आहे. त्याचबरोबर १२८ जीबी स्टोरेज मॉडेलही उपलब्ध आहे.
- ६.६ इंचाची फुल एचडी प्लस पॅनल दिला आहे. त्याचं रेजोल्यूशन २४००x१०८० पिक्सल आहे.
- ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे. तर सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सल आहे. समोरचा कॅमेरा १६ मेगापिक्सलचा असून तो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयोग होतो.