अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई-कॉमर्स वेबसाइट आहेत. दोन्ही ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणि डिस्काउंटसह सेलची घोषणा करत असतात. ८ ऑक्टोबरपासून अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरु होणार आहे. तर फ्लिपकार्ट प्लस आणि अॅमेझॉन प्राइमचे सदस्य असणाऱ्यांना या सेलमध्ये ७ तारखेपासूनच प्रवेश मिळणार आहे. या दोन्ही वेबसाइटकडून अनेक गोष्टींवर आकर्षक डिस्काउंट मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये स्मार्टफोन,टॅबलेट आणि लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा समावेश आहे.
सेल सुरु होण्याआधीच फ्लिपकार्ट आणि Amazon ने काही ऑफर्सबाबत खुलासा केला आहे. या ऑफर्सनुसार, दोन्ही वेबसाइट रेडमी नोट ५जी या स्मार्टफोनवर डिस्काउंट देत आहे. रेडमी नोट ५ जी स्मार्टफोन ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्यात आला आहे. रेडमीने आपल्या रेडमी नोट ५जी ची ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन हवे आहे? रिलायन्स जिओचे ‘हे’ प्लॅन्स एकदा पाहाच
Redmi Note 12 5G: फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरील डिस्काउंट
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर फेस्टिव्हल सेल आधी रेडमी नोट १२ ५जी या फोनचे ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणारे व्हेरिएंट भारतात १५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. अॅमेझॉनवरील एका फोटोनुसार ऑरमध्ये डिस्काउंट , अतिरिक्त बँक ऑफर्स आणि एक्सचेंज या पर्यायांचा समावेश आहे. तर फ्लिपकार्ट रेडमी नोट ५ जी चे तेच मॉडेल १०,७९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहे. ज्यामध्ये ट्रेड इन अलाउन्सचा समावेश आहे. हा स्मार्टफोन Frosted Green, Matte Black, आणि Mystique Blue या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
फीचर्स
रेडमी नोट १२ ५ जी मध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनमधील डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चे संरक्षण देण्यात आले आहे. या फोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. यात ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ३३ W च्या फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.यामध्ये यूएसबी टाइप -सी पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे.