Redmi Note 12 Pro Plus 5G India Launch : रेडमी फोनची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेडमी नोट 12 सीरिजच्या स्मार्टफोनची प्रतीक्षा आता लवकरच थांबणार आहे. कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा स्मार्टफोन लॉंच करण्यात येणार आहे. 5 जानेवारीला या स्मार्टफोनची सीरिज अधिकृतपणे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. पुढील महिन्यात रेड मी नोट 12 मॉडेल्सचे स्मार्टफोन लॉंच करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात आलंय.

Redmi Note 12 Pro Plus या स्मार्टफोनमध्ये 200 MP प्रायमरी रिअर कॅमेराची सिस्टम असणार आहे, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. चीनमध्ये हा स्मार्टफोन मागील काही महिन्यांपूर्वीच उपलब्ध करण्यात आला आहे. 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला रेडमी नोट 12 प्रो प्लसची विक्रीही चीनमध्ये सुरु करण्यात आली आहे. भारतात लॉंच होणाऱ्या रेडमी नोट 12 प्रो प्लस स्मार्टफोनच्या इतर फिचर्सबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली नाहीय. चीनच्या मॉडेलप्रमाणे या स्मार्टफोनमध्येही भन्नाट फिचर्स असतील, कंपनीवर असा विश्वास आपण ठेवूयात.

नक्की वाचा – Twitter Blue Tick: ट्विटरवरील ब्लू टिक व्हेरीफीकेशन किती रुपयांमध्ये उपलब्ध होणार? जाणून घ्या नवी किंमत आणि फिचर्स

रेडमी नोट 12 मध्ये जबरदस्त फिचर्स असणार आहेत. 6.67 इंच Full HD OLED डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटनुसार असणार आहे. तसंच MediaTek डायमेन्सिटी 1080 Soc असणार आहे. 12 GB LPDDR4X RAM या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये 5000 mAh च्या बॅटरी असून 120w ची फास्ट चार्चिंगची सिस्टमही या फोनमध्ये असणार आहे. अत्यंत महत्वाचं म्हणजे, रेडमी नोट 12 प्रो प्लसमध्ये 200 MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम रिअल पॅनलवर असणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी स्मार्टमध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे. कंपनीनं भारतात लॉंच करण्यात येणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत जाहीर केली नाहीय. मात्र, चीनमध्ये हा फोन 2300 रुपयांना विक्री केला जात आहे. त्या फोनमध्ये 8GB RAM+256GB स्टोरेज मेमरी आहे.