Xiaomi ही मोबाईल कंपनी आपली Redmi Note 12 ही सिरीज भारतात लाँच झाली आहे. Redmi Note हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्सपैकी एक आहे. Xiaomi कंपनी स्मार्टफोन्सच्या लाँचिंगचे थेट प्रसारण हे त्यांच्या अधिकृत युट्यूब आणि इंस्टाग्राम हँडलवर सुरु आहे. तर आपण जाणून घेऊयात स्मार्टफोन्सचे फीचर्स.

Redmi Note 12 Pro

Redmi Note 12 चा प्रोसेसर हा ४ त्या जनरेशन चा असून त्याचा कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तसेच Redmi Note 12 Pro कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा आहे. हा स्मार्टफोन ७. एमएम जाडीचे स्लिम डिव्हाईस आहे. यामध्ये Sony IMX766 सेन्सर आहे. हे डिव्हाईस ५ जी असून, ६७ वॅट चे फास्ट चार्जिंग होते. रेडमी नोट १२ प्रो मध्ये १०८० चा प्रोसेसर आणि १२ जीबी रॅम येते. या डिव्हाईसचा Imagiq ISP देखील आहे जो 200 MP कॅमेराला सपोर्ट करतो. रेडमी नोट १२ प्रो मध्ये १०८० चा प्रोसेसर आणि १२ जीबी रॅम येते. या डिव्हाईसचा Imagiq ISP देखील आहे जो 200 MP कॅमेराला सपोर्ट करतो.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rbi received threatening phone call from Lashkar e Taiba
रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी, कशी आणि कोणती धमकी दिली वाचा…
subhash ghai reveals success secret
कलाकृतीत भारतीयत्व असेल तर ती दीर्घकाळ यशस्वी ठरते, दिग्दर्शक सुभाष घई यांनी उलगडले त्यांच्या यशामागचे इंगित
Seven stalled projects on track soon speed up land acquisition process in five projects
रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
KL Rahul Statement on Lucknow Super Giants Exit Reveals Reason Ahead of IPL 2025 Auction Said I wanted Freedom
KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण

हेही वाचा : २०० मेगापिक्सल कॅमेरा, ५ जीबी रॅम अन्…; आकर्षक फीचर्ससह Redmi Note 12 भारतात होणार लाँच

Redmi Note 12 Pro+

Redmi Note 12 Pro+ ला १२० Wवॅटचे फास्ट चार्जिंग मिळते. जे फक्त १९ मिनिटांत डिव्हाइस चार्ज करेल. या फोनमध्ये ४९८० mAh क्षमतेची बॅटरी आहे. Xiaomi म्हणते की या प्रकारचे फास्ट चार्जिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे डिव्हाइस तापणार नाही.रेडमी नोट १२ प्रो प्लस त्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करत असून, त्याबद्दल लाँच इव्हेंटमध्ये देखील याचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे. याला मे कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा येतो. रेडमी नोट प्लस प्रो प्लस हा HPX सेन्सरयुक्त येतो. रेडमीचा दावा आहे की मोठ्या सेन्सरमुळे या फोनवरील इमेज क्वालिटीमध्ये कमालीची सुधारणा होईल.

Redmi Note 12 Pro Plus ची किंमत

रेडमी नोट प्लस प्रो या स्मार्टफोनची किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनसाठी २९,९०० रुपये असेल. तर १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ३२,९९९ रुपये इतकी असेल. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स मुळे याच्या किंमती २५,९९९ ते २८,९९९ रुपये इतक्या कमी होतात.

Redmi Note 12 Pro किंमत आणि ऑफर्स

Redmi Note 12 Pro ची किंमत २४,९९९ रुपये इतकी असून यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज येते. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत ही २६,९९९ रुपये इतकी असणार आहे. त्यासोबतच ८जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ही २७,९९९ रुपये असेल.बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसमुळे याची किंमत २०,९९९ रुपये इतकी खाली जाऊ शकते.

Redmi Note 12: किंमत आणि उपलब्धता

Redmi Note 12 च्या किंमत १५,४९९ रुपये असून यामध्ये ४जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणार आहे. सेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही १९,९९९ रुपये असणार आहे. सध्या तुमच्याकडे Xiaomi/Mi किंवा Redmi फोन असतील आणि तुम्ही हे नवीन फोन घेताना ते एक्सचेंज केल्यास तुम्हाला १००० रुपयांची सूट मिळणार आहे.