रेडमी नोट हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्सपैकी एक आहे. तर आता Xiaomi ही मोबाइल कंपनी आपली रेडमी नोटची ‘१३’ ही नवीन सीरिज भारतात लाॅॅन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्मार्टफोन लॅान्चसाठी हा आठवडा मोठा असणार आहे. कारण आज ४ जानेवारीला भारतीय बाजारपेठेसाठी दोन मोठे स्मार्टफोन लॅान्च होणार आहेत. विवो कंपनी, फ्लॅगशिप विवो एक्स १०० आणि विवो एक्स १०० प्रो (Vivo X100 and Vivo X100 Pro) लॅान्च करत आहे आणि आजच रेडमी नोट १३ (Redmi Note 13) सीरिजदेखील लाॅन्च केला जाईल . रेडमी नोट १३ सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन्सचा म्हणजेच… १. रेडमी नोट १३ ५ जी; २. रेडमी नोट १३ प्रो; ३. रेडमी नोट १३ प्रो मॅक्स आदींचा समावेश असेल.
रेडमी नोट १३ ५जी (Redmi Note 13 5G ) सीरिज ४ जानेवारी म्हणजेच आज लाॅन्च होणारआहे. हा मोबाइल फोन कसा असेल, त्याचे फिचर्स काय असतील याची माहिती समोर आली आहे. तर या स्मार्टफोनबद्दलच्या पाच महत्वाच्या गोष्टी पाहू…
१. Xiaomi रेडमी नोट १३ ५जी डिस्प्ले (Redmi Note 13 5G Display) :
स्मार्टफोनमध्ये ९३.३ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह अगदी हलका बेझल्ससह डिस्प्ले असेल. तसेच टीझरमध्येसुद्धा सांगितलं आहे की, १२ एचझेड (12 Hz) पर्यंत रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ५ च्या संरक्षणासह AMOLED डिस्प्ले असेल.
२. Xiaomi रेडमी नोट १३ ५जी डिझाइन (Redmi Note 13 5G Design) :
रेडमी नोट १३ प्रो आणि नोट १३ प्रो प्लस मॉडेल्स पेस्टल आणि जांभळ्या रंगाच्या शेडमध्ये आहेत. स्मार्टफोन फक्त ७.६ मिमी (7.6 mm ) १७३.५ ग्रॅम वजनासह अतिशय हलका असेल. तसेच रेडमी नोट १३ ५जी आर्क्टिक व्हाइट कलर पर्यायातसुद्धा उपल्बध असेल.
३. रेडमी नोट १३ ५जी कॅमेरा (Xiaomi Redmi Note 13 5G Camera) :
स्मार्टफोन १०८ एमपी ट्रिपल कॅमरा सेटअपसह असेल.
४. Xiaomi रेडमी नोट १३ ५जी चिपसेट ( Xiaomi Redmi Note 13 5G Chipset ) :
रेडमी नोट १३ ५जी मध्ये MediaTek Dimensity ६०८० प्रोसेसर, २० GB पर्यंत RAM असेल. विशेष म्हणजे यामध्ये कंपनीने विस्तारित रॅम फिचरचा समावेश केला आहे. स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम ऑनबोर्ड आणि उर्वरित ८ जीबी रॅम डिव्हाइसवरील स्टोरेज स्पेसची असेल. तसेच स्मार्टफोन Qualcomm Snapdragon ७एस जेन २ (7s Gen 2) चिपसेटद्वारे समर्थित आहे.
५. रेडमी नोट १३ ५जी बॅटरी (Xiaomi Redmi Note 13 5G Battery) :
स्मार्टफोन 33W टर्बो चार्जिंग सपोर्टसह येतील. यामुळे चार्जिंगचा वेग अर्ध्या तासात १०० टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज होईल.
तर या पाच महत्वाच्या गोष्टी Xiaomi च्या रेडमी नोटच्या नवीन सीरिजमध्ये असणार आहे.