चीनमध्ये प्रथम सर्वांसमोर आलेली रेडमी नोट १३ सीरिज भारतामध्ये लॉन्च झाली आहे. कंपनीने या सीरिजचे स्टॅण्डर्ड, प्रो व प्रो प्लस अशी तीन व्हर्जन्स बाजारात आणली आहेत. या तिन्हीही फोनची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स काय आहेत ते पाहा. त्यासोबतच ग्राहकांना हे स्मार्टफोन कधी विकत घेता येईल तेही पाहू.
Redmi Note 13 सीरिज स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 13
यात ६.६७ इंच स्क्रीन आणि AMOLED डिस्प्ले, १२०Hz रिफ्रेशरेटसह बसवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन पॉवर्डबाय मीडिया टेक डायमेन्सिटी ६०८० चिपसेट [MediaTek Dimensity 6080 chipset] असणार आहे. त्यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. त्यामध्ये अॅण्ड्रॉइड १३ असून रेडमीचा हा पहिलाच फोन असणार आहे; जो HyperOS सोबत काम करणार आहे. हा फोन सिस्टीममधील क्लिष्टता आणि डिव्हाइसच्या विविध इकोसिस्टीमला सुरळीत ठेवण्यासाठी बनवला गेला आहे.
हेही वाचा : पुणे सायबर फ्रॉड! सोशल मीडियावर पोस्ट लाइक करताच बसला २० लाखांचा फटका; जाणून घ्या काय आहे प्रकरण….
HyperOS हे तुम्हाला विविध डिव्हाइस एकत्रित करून, काम सुरळीत करण्यास मदत करीत असते. त्यामुळे वापरकर्त्यांना सहजतेने विविध डिव्हाइसवर काम करता येते, पर्यायी डिव्हाइसवर फोन कॉल्स घेता येतात, तुमच्या फोनचा रीअर कॅमेरा हा लॅपटॉप, वेबकॅमप्रमाणे काम करू शकतो, फोनमधील डेटा शेअर करता येऊ शकतो. यांसारख्या कितीतरी सुविधा या HyperOS मुळे वापरकर्त्यांना मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे, असे इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते. त्यासोबतच या सुधारित इंटरफेसमध्ये, IOS-inspired लॉक स्क्रीन, कस्टमायजेबल विजेट्स, डायनॅमिक-आयर्लंडसारखी नोटिफिकेशन सिस्टीम आणि क्विक सेटिंग मेन्यूसुद्धा देण्यात आला आहे.
कॅमेऱ्याबद्दल सांगायचे झाले, तर यात १०० मेगापिक्सेल मुख्य सेन्सर आणि २ मेगापिक्सेल मायक्रो सेन्सर, ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सेल सेन्सर फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये ५०००mAh बॅटरी असून, ती ३३W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनसह त्याचा फास्ट चार्जरसुद्धा बॉक्समध्ये येणार आहे.
Redmi Note 13 प्रो :
या स्मार्टफोनमध्येही ६.६७ इंच स्क्रीन आणि AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. पॅनेल १.५K रिसोल्युशनवर काम करते. त्यासोबतच स्क्रीनला कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टसने सुरक्षित करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन पॉवर्डबाय क्वालकम स्नॅपड्रॅगन ७s जेन २ [चिपसेट [Qualcomm Snapdragon 7s Gen 2 chipset] असणार आहे; ज्यामध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. बेस मॉडेलप्रमाणेच हा फोनदेखील अॅण्ड्रॉइड 13 OS वर काम करतो.
त्यामध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप बसवण्यात आला आहे; ज्यामध्ये २०० मेगापिक्सेल सॅमसंग ISOCELL HP3 प्रायमरी सेन्सर, ओएसआय म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनचा वापर करण्यात आला आहे. त्यासह ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर, आणि सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. स्टॅण्डर्ड फोनपेक्षा नोट १३ प्रोमध्ये मोठी बॅटरी म्हणजेच ५१००mAh बॅटरी जी ६७W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, अशी बसवण्यात आली आहे.
Redmi Note 13 प्रो+ :
वरील दोन्ही स्मार्टफोनप्रमाणेच यामध्ये डिस्प्ले, OS सिस्टीम, स्टोरेज व कॅमेरा देण्यात आला आहे. मात्र, याच्या बॅटरी आणि चिपसेटमध्ये फरक आहे. हा फोन पॉवर्डबाय मीडिया टेक डिमेन्सिटिव्ह ७२०० अल्ट्रा SoC [MediaTek Dimensity 7200 Ultra SoC] असणार आहे. तर १२०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५०००mAh अशी याची बॅटरी असणार आहे.
हेही वाचा : Vivo X100 आणि Vivo X100 Pro स्मार्टफोनचे प्री बुकिंग सुरू; भन्नाट फीचर्ससह किंमतदेखील जाणून घ्या….
Redmi Note 13 सीरिज स्मार्टफोनची किंमत
रेडमी नोट १३ ५G बेस मॉडेल- ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट १६,९९९ रुपयांना मिळणार आहे.
८जीबी रॅम + २५६GB स्टोरेज मॉडेल १८,९९९ रुपयांना.
तर, १२GB रॅम + २५६GB स्टोरेज कॉन्फिगरेशन फोन २०,९९९ रुपयांना मिळणार आहे.
रेडमी नोट १३ प्रो ५G – ८GB रॅम + १२८GB स्टोरेज फोन, २३,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
८GB रॅम + २५६ GB स्टोरेज मॉडेल २५,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
१२GB रॅम + २५६ GB स्टोरेज फोन हा २७,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
रेडमी नोट १३ प्रो+ ५G -८GB रॅम + २५६GB स्टोरेज मॉडेल २९,९९९ रुपयांना मिळणार आहे.
१२GB रॅम + २५६GB स्टोरेज व्हर्जन ३१,९९९ रुपयांना मिळणार आहे.
१२GB रॅम + ५१२GB स्टोरेज मॉडेल ३३,९९९ रुपयांना मिळणार आहे.
जानेवारीच्या १० तारखेपासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही शॉपिंग साइटवर याचा पहिला सेल सुरू होणार आहे.