सध्या भारतात रिलायन्स जिओ , एअरटेल या दोन लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांनी अनेक शहरांमध्ये आपली ५जी नेटवर्क सेवा सुरु केली आहे. तसेच आता जिओने आणखी एक नवीन विक्रम केला आहे. रिलायन्स जिओने देवभूमी उत्तराखंडच्या चारधाम – बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिर संकुलात आपली ट्रू 5G सेवा सुरू केली आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या निमित्ताने Jio ची 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. आता देशभरातून चारधामला पोहोचणाऱ्या लाखो भाविकांना 5G च्या अल्ट्रा हाय स्पीडचा लाभ मिळणार आहे.
केदारनाथ धाम यात्रा २०२३ नुकतीच सुरु झाली आहे. केदारनाथ मंदिर हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर उत्तराखंड राज्यात आहे. अशा स्थितीत दरवर्षी भारतातील विविध राज्यातून आणि परदेशातून लाखो भाविक केदारनाथ मंदिरात शिवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. हे मंदिर खूप उंचीवर असल्याने हवामानाचा विचार करता मंदिराचे दरवाजे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच उघडले जातात. यंदा २२ एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.
बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी रिलायन्स जिओच्या 5G सेवेचे उद्घाटन केले. Jio True 5G लॉन्च प्रसंगी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले , “रिलायन्स जिओने उत्तराखंडमधील चारधाम परिसरामध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. राज्याच्या डिजिटल क्रांतीमध्ये बदल घडवून आणण्याबद्दल जिओचे आभार मानतो व त्यांचे अभिनंदन करतो.”व्हिडिओमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री धामी पुढे म्हणाले, “या सुविधेमुळे, राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या लाखो यात्रेकरूंना हायस्पीड डेटा नेटवर्कचा लाभ घेता येईल.
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून भारत-तिबेट सीमेवरील उत्तराखंडमधील पहिले भारतीय गाव माना पर्यंत रिलायन्स जीओचे नेटवर्क पसरलेले आहे. राज्यात जिओ हे एकमात्र ऑपरेटर असे आहे ज्याचे नेटवर्क सर्व चारधाममध्ये, केदारनाथ धमाच्या ट्रेकमार्गावर आणि १३,६५० मित्र उंचीवर असलेल्या श्री हेमकुंड साहिब गुरुद्वारामध्ये उपलब्ध आहे.
चारधाममध्ये ट्रू जिओ ५ जी नेटवर्कच्या लॉन्चन्ग वेळी जिओचे प्रवक्ते म्हणाले, “आम्ही चारधाम मंदिर परिसरात Jio true 5G सेवा सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. Jio true 5G उत्तराखंडसाठी गेम चेंजर ठरेल. त्यातून विद्यार्थी, नागरिक तसेच अभ्यागतांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. डिसेंबर 2023 पर्यंत, जिओ आपले 5G नेटवर्क उत्तराखंडमधील प्रत्येक शहर, तहसील आणि तालुक्यात विस्तारित करेल. उत्तराखंड डिजीटल करण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत