रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशामध्ये सर्वात पहिल्यांदा ५जी नेटवर्कची सुरूवात केली आहे. तसेच जिओ आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी अनेक प्लॅन्स लॉन्च करत असते. ज्यामध्ये वापरकर्त्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. रिलायन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांना २८ दिवसांसाठी JioSaavn Pro चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने मोफत जिओ सावन प्रो सबस्क्रिशनसह अनेक प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत.

जर का तुम्हाला जिओ सावन प्रो चे सबस्क्रिप्शन खरेदी करायचे असल्यास तुम्ही जिओच्या एका प्रीपेड प्लॅनची खरेदी करू शकता. जो आधीपासूनच अनेक फायद्यांसह येतो. तुम्हाला स्वतंत्रपणे जिओ सावन प्रो चे सबस्क्रिप्शन हवे असेल तर तुम्ही ३० किंवा ३६५ दिवसांसाठी ९९ रूपये किंवा ७४९ रूपयांमध्ये मिळवू शकता. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Naxal-free, India, Naxalism, Naxal,
देशातील ६० जिल्हे नक्षलमुक्त ? जाणून घ्या, देशातील नक्षलवादाची स्थिती
Honda launches new Amaze
Honda Amaze : अपडेटेड सेडानचे ऑफलाइन बुकिंग सुरू; ४५ दिवसांपर्यंत फक्त १० लाख रुपयांपर्यंत करा खरेदी; पण फीचर्स काय असणार?

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: ‘रक्षाबंधन’ निमित्त बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ शकता ‘हे’ बेस्ट गॅजेट्स

जिओसावन हे एक ऑनलाइन म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. जे वापरकर्त्यांना अनेक डिव्हाइसेसवरून त्यांची प्रोफाइल अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी देते. तसेच ऑफलाइन डाउनलोड करण्याची देखील परवानगी देते. रिलायन्स जिओच्या प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घेऊयात. ज्यात २८ दिवसांची वैधता जिओसावन प्रो आणि ४२ जीबी डेटा देखील मिळतो.

रिलायन्स जीओचा २६९ रूपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या २६९ रूपयांच्या प्लॅनमध्ये मोफत जिओसावन प्रो चे सबस्क्रिप्शन मिळते. तसेच वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये ४२ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता २८ दिवस इतकी आहे. जिओ सावन प्रो च्या मोफत सब्स्क्रिप्शनसह या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना JioCloud, JioCinema आणि JioTV यासह Jio प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेश मिळतो.

हा प्लॅन खरेदी करणारे वापरकर्ते जिओच्या ५जी वेलकम ऑफर अंतर्गत अनलिमिटेड ५जी डेटासाठी पात्र असणार आहेत. रिलायन्स जिओने आपले ५जी कव्हरेज आतापर्यंत देशातील ,२५८ गावे/ शहरांमध्ये पोहोचवले आहे. २०२३ च्या केहरीस देशातील प्रत्येक तालुका आणि शहरात ५जी नेटवर्क सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Story img Loader