हल्ली प्रत्येकाकडेच स्मार्टफोन असतो. प्रत्येकजण आपल्याला कसल्या गोष्टीची गरज आहे त्यानुसार प्रत्येकजण स्मार्टफोनची खरेदी करतो. म्हणजे कॅमेरा, स्टोरेज, डिस्प्ले बघून आपण याची खरेदी करतो. सध्या अनेक मोबाइल उत्पादक कंपन्या नवनवीन स्मार्टफोन भारतामध्ये लॅान्च करत असतात. आपले काम पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असते. काही अधिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स महागडे असतात त्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य होत नाही. मात्र आज आपण बेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोन जे फक्त २५,००० रुपयांच्या आतमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात.

गेल्या काही महिन्यांमध्ये oneplus , Lava , oppo आणि अनेक कंपन्यांनी आपले फोन लॉन्च केले आहेत. त्यामध्ये अनेक नवीन फीचर्स, चांगला कॅमेरा देण्यात आले आहेत. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर हे स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. आज आपण २५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करता येतील असे कोणकोणते स्मार्टफोन्स आहेत ते जाणून घेणार आहोत.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
India highest grossing movie in china Secret Superstar
फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

हेही वाचा : टेलिकॉम क्षेत्रात उडाली खळबळ! ‘ही’ कंपनी आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

iQOO Z7

iQOO Z7 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.३८ इंचाचा AMOLED डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. त्याचा रिफ्रेश रेट हा ९०Hz इतका आहे. तसेच फोनमध्ये तुम्हाला ६ आणि ८ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यांना या फोनमध्ये ४५००mAh ची बॅटरी आणि चार्जिंगसाठी ४४W चा रॅपिड सपोर्ट देण्यात आला आहे.

iQOO Z7 ५जी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टीम मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने फिंगरप्रिंट सेन्सरचे फिचर देण्यात आले आहे. फोटो काढण्यासाठी यामध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच (OIS) स्पोर्टचा ६४ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा येतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वायफाय आणि जीपीएस फीचर्स देण्यात आले आहेत. iQOO Z7 ५जी या स्मार्टफोनची ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १९,९९९ रुपये इतकी आहे.

Lava Agni 2

Lava च्या या फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफरेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनचा डिस्प्ले AMOLED असणार आहे. याबाबतचा एक टीझर जारी केला आहे. त्यामध्ये याचा डिस्प्ले हा कर्व्ह आहे. Lava च्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इतके स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय यामध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि ४४ w चे वायरचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच फोनमध्ये टाइप-सी चा सपोर्ट मिळेल. याशिवाय या लावा फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर मिळणार आहे.

Lava Agni 2 5G हा स्मार्टफोन २४ मे पासून Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. याची किंमत कंपनीने २१,९९९ रुपये ठेवली आहे. परंतु ग्राहकांना सर्व प्रमुख डेबिट आणि क्रेडिट कार्डवर २,००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. डिस्काउंटमुळे त्याची किंमत १९,९९९ रुपये होईल.

हेही वाचा : SmartPhones Under 60000: जबरदस्त फिचर असलेले स्मार्टफोन खरेदी करताय? ‘हे’ आहेत बेस्ट, पाहा फीचर्स-किंमत

Poco X5 Pro

Poco X5 Pro ला Redmi Note 12 Pro+ प्रमाणेच फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये वापरकर्त्यांना ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा , १०८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर दिला आहे. तसेच ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज कंपनीकडून वापरकर्त्यांना मिळणार आहे. या डिव्हाइसमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी वाव ६७ वॅटचे चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. पोको एक्स प्रो मध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपयांपासून सुरु होते.

Realme 10 Pro

रिअलमी १० प्रो या स्मार्टफोनमध्ये ६.७२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुलएचडी + रिझोल्युशन ऑफर करते. स्क्रीनचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका आहे. फोनमध्ये 1mm अल्ट्रा-स्लिम बेझल्स देण्यात आले आहे. Realme 10 Pro स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 13 आधारित Realme UI 4.0 सह येतो.

Realme 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच फूल एचडी + डिस्प्ले, अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित रिअल मी यूआय ४.०, स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी एसओसी, अड्रिनो ए६१९ जीपीयू, ८ जीबी रॅम, १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा, सेल्फीसाठी १६ एमपी कॅमेरा, ५००० mAh बॅटरी, ३३ वॉट सुपर व्हीओओसी फास्ट चार्जिंग मिळते. फोन २० मिनिटांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे. Realme 10 Pro हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. यामधील ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १९,९९९ रुपये इतकी आहे.