सध्या अनेक युजर्स ओटीटी प्लॅटफॉर्म्स नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, डिस्नी हॉटस्टार आदी अनेक ॲप्सवर विविध शो, चित्रपट, सीरिज पाहण्याचा आनंद लुटतात. आता या सर्व ॲप्सचे तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्याची गरज भासणार नाही. कारण- रिलायन्स जिओ कंपनीने ग्राहकांसाठी खास प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्ही एकाच वेळी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकणार आहात.
लोकप्रिय दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने नवीन ‘जिओ टीव्ही ॲप’चे (JioTV) प्रीमियम प्लॅन्स लाँच केले आहेत. ओटीटी पाहणाऱ्या युजर्ससाठी हे प्लॅन्स खास असणार आहेत. या प्लॅनमुळे युजर्सना विविध ॲप्सवरील वेगवेगळे शो, चित्रपट एकाच ठिकाणी बघणे आणि डाउनलोड करणे सोपे होणार आहे. जिओ टीव्हीचा प्रीमियम प्लॅन ३९८ रुपयांपासून सुरू होतो. तसेच हा प्लॅन ग्राहकांना वेगवेगळ्या ॲप्सवरील मनोरंजनाचा आनंद लुटण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिओ टीव्ही हटके प्लॅन्स :
जिओच्या या खास प्लॅनसह तुम्हाला आता वेगवेगळ्या ॲप्सवरील विविध प्लॅन्स विकत घेण्याची, तसेच बरेच पासवर्ड किंवा लॉग इन माहिती (इन्फॉर्मेशन) लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्याऐवजी आता युजर्स एकाच ॲपमधून म्हणजेच ‘जिओ टीव्ही’ ॲपच्या (JioTV) प्रीमियम प्लॅन मधून मनोरंजनाचा आनंद लुटू शकणार आहेत. पहिला प्लॅन ३९८ पासून सुरू होतो; ज्याचा कालावधी २८ दिवसांचा आहे. तसेच दुसरा ११९८ रुपयांचा प्लॅन हा ८४ दिवसांचा आणि ४,४९८ रुपयांचा प्लॅन ३६५ दिवसांचा आहे. तसेच सगळ्यात स्वस्त प्लॅन २जीबी डेटा आणि १२ ओटीटी ॲप्सच्या ॲक्सेससह येतो; तर बाकीचे प्लॅन्स १४ ओटीटी ॲप्सच्या ॲक्सेससह २ जीबी डेटा देतात.
एका क्लिकवर मिळणार ग्राहक सेवा :
तसेच जिओ टीव्ही प्रीमियमच्या हटके प्लॅन्समध्ये काही खास फीचर्ससुद्धा असणार आहेत. जिओ टीव्ही प्लॅन्समध्ये शो व चित्रपट शोधण्यासाठी आणि त्यांची उत्तम निवड करण्यासाठी युजर्सना मदत करतील. तुम्ही या ॲपवर दर तीन महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा रिचार्ज करू शकता. तसेच जर तुम्हाला पूर्ण वर्षभराचा रिचार्ज करायचा असेल, तर तुम्हाला त्वरित ग्राहक सेवा आणि हप्त्यांमध्ये इन्स्टॉलमेंट्स रिचार्ज करण्याची अतिरिक्त मदतसुद्धा मिळते. तसेच तुमचा प्लॅन तुम्हाला कोणत्या कालावधीपर्यंत हवा आहे हे तुम्ही ठरवू शकता आणि त्यानंतर तुमचा जिओ मोबाइल नंबर वापरून जिओ टीव्ही ॲपमध्ये लॉग इन करू शकता. त्यानंतर तुम्ही पुन्हा लॉग इन न करता, या ॲपवर शो आणि चित्रपट सहज पाहू शकता.
पण, जिओ सिनेमा प्रीमियम (Jio Cinema Premium), ॲमेझोन प्राइम व्हिडीओ [Amazon Prime Video (Mobile Edition)], डिस्नी प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar) आदी काही ॲप्स आहेत; ज्यांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी काही अतिरिक्त स्टेप्स फॉलो करण्याची आवश्यकता आहे. जिओ सिनेमा प्रीमियममध्ये जाण्यासाठी तुम्ही ‘माय जिओ’वरील (MyJio) कूपन वापरू शकता. तसेच ॲमेझॉन प्राइमला ‘माय जिओ’द्वारे (MyJio) अॅक्टिव्हेट करण्याची आवश्यकता आहे. या सर्व ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डिस्नी प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) ॲक्सेस मिळेल. तर जिओ कंपनीने ‘जिओ टीव्ही ॲप’चे (Jio TV) प्रीमियमचे तीन प्लॅन्स लाँच केले आहेत; ज्यात तुम्ही विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शो आणि चित्रपट पाहून मनोरंजनाचा आनंद द्विगुणीत करू शकता.