भारतामध्ये सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. रिलायन्स जिओ आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. तीनही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असतात. सध्या जिओने दोन नवीन प्रीपेड प्लॅन आपल्या लिस्टमध्ये जोडले आहेत. तर हे दोन प्लॅन कोणकोणते आहेत , त्यामध्ये कोणते फायदे मिळणार आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड डेटा पॅक आणले आहेत. या प्लॅनची किंमत १९ आणि २९ रुपये अशी आहे. १ किंवा २ जीबीपेक्षा जास्त डेटा हवा असल्यास ग्राहकांना हे प्लॅन्स फायदेशीर ठरणार ठरू शकतात. जिओने नेहमीच सर्वात स्वस्त खाजगी टेलिकॉम ऑपरेटर म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. १९ आणि २९ रुपयांच्या प्लंबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
ट्विटरकडे आहेत ‘हे’ भन्नाट फीचर्स, मेटा Threads मध्ये मात्र अजूनही उपलब्ध नाहीत, एकदा पहाच
जिओचा १९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओ १९ रुपयांमध्ये १.५ जीबी डेटा ऑफर करत आहे. या पॅकची वैधता वापरकर्त्यांच्या विद्यमान प्रीपेड पॅकसारखीच आहे. हे १५ रुपयांच्या पॅकपेक्षा एक पाऊल पुढे असणार आहे. म्हणजेच जर का तुम्हाला ५०० MB अतिरिक्त डेटा हवा असेल तर तुम्हाला फक्त ४ रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. ही योजना वापरकर्त्यांसाठी डिकॉय इफेक्ट म्हणून काम करू शकते.
जिओचा २९ रुपयांचा प्लॅन
जिओच्या २९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये २.५ जीबी डेटा मिळतो. या पॅकची वैधता वापरकर्त्यांच्या विद्यमान प्रीपेड पॅकसारखीच आहे. सध्याच्या 25 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅनसह रिचार्ज करणार्या वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन डिकॉय इफेक्ट म्हणून काम करेल. रिलायन्स जिओच्या २५ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा मिळतो.