रिलायन्स जिओने अलीकडेच घोषणा केली आहे की कंपनी लवकरच देशभरात 5G नेटवर्क सुरू करेल. जिओने देशात पहिल्यांदा 4G नेटवर्क आणून धुमाकूळ घातला होता. रिलायन्स जिओने अल्पावधीतच देशात मोठा यूजर बेस तयार केला आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओने आपल्या ग्राहकांसाठी अनेक रेंजमध्ये प्रीपेड प्लॅन आखले आहेत. आम्ही तुम्हाला Jio च्या त्या प्रीपेड रिचार्जबद्दल सांगू जे दररोज १ GB डेटा देतात. त्यांची किंमत १४९ रूपयांपासून सुरू होते. जाणून घ्या जिओच्या या सर्व रिचार्ज प्लॅन्सबद्दल…
209 Rupees Jio Prepaid Plan
रिलायन्स जिओच्या २०९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २८ जीबी डेटा ऑफर करण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो.
आणखी वाचा : Nothing Phone (1) च्या Lite वर्जनबद्दल कार्ल पेई यांनी मोठी माहिती दिली, जाणून घ्या
याशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्सही उपलब्ध आहेत. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस ऑफर केले जातात. या प्रीपेड पॅकमध्ये JioTV, JioCinema, Jio Security आणि Jio Cloud देखील उपलब्ध आहेत.
179 Rupees Jio Prepaid Plan
रिलायन्स जिओच्या १७९ रुपयांच्या जिओ प्रीपेड प्लॅनची वैधता २४ दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २४ GB डेटा मिळतो.
जिओच्या या स्वस्त प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधाही देण्यात आली आहे. म्हणजेच कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय युजर देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
आणखी वाचा : १५० W फास्ट चार्जिंग आणि १६ GB RAM चा OnePlus 10T फोन, जाणून घ्या टॉप ५ फीचर्स
149 Rupees Jio Prepaid Plan
रिलायन्स जिओच्या १४९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता २० दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १ GB डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २० जीबी डेटा मिळतो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस ऑफर केले जातात.
या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते.