Jio Prepaid Plan With One Year Validity : रिलायन्स जिओने अल्पावधीतच देशात मोठा युजरबेस तयार केला आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओकडे विविध वैधता, डेटा आणि किंमत या कॅटेगरीमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आहेत. जिओचे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार रिचार्ज करू शकतात. कंपनी रिलायन्स जिओ ग्राहकांना ३६५ दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन देखील ऑफर करते. म्हणजेच 1 वर्षाच्या प्रीपेड प्लॅनसह पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. Jio च्या २,८७९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल सांगत आहोत जो १ वर्षाची वैधता आणि अनलिमिटेड ऑफरसह येतो.
रिलायन्स जिओचा २,८७९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या २,८७९ रूपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे, म्हणजे पूर्ण वर्ष. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. ग्राहक एकूण ७३० GB हाय-स्पीड 4G डेटाचा लाभ घेऊ शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत कमी होतो.
आणखी वाचा : Cyrus Mistry यांच्या निधनानंतर सरकारने Amazon साठी जारी केला आदेश! हे प्रोडक्ट विकण्यास मनाई
रिलायन्स जिओच्या या वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल ऑफर केले जातात. म्हणजेच, ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतो. जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत.
आणखी वाचा : ७९९ रूपयांचा Jio चा पोस्टपेड-प्रीपेड प्लॅन: Netflix, Prime Video आणि Hotstar मोफत, अनलिमिटेड कॉल, डेटा
रिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लान JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.
याशिवाय रिलायन्स जिओकडे असे अनेक प्रीपेड पॅक आहेत जे ३६५ दिवसांची वैधता देतात. ३६५ दिवसांची वैधता असलेल्या दोन प्लॅनची किंमत ४,१९९ रुपये आणि २,९९९ रुपये आहे.
आणखी वाचा : 4K टीव्हीच्या किमतीत ५०, ५५ आणि ६५ इंच स्क्रीन असलेले ३ नवीन थॉमसन टीव्ही लाँच, पॉवरफुल फीचर्स
सर्वप्रथम २,९९९ रुपयांच्या Jio प्रीपेड प्लॅनबद्दल बोलूया, ज्यामध्ये दररोज २.५ GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्रीपेड पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलसह दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शनही मोफत आहे.
तसंच ४,१९९ रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये दररोज ३ जीबी डेटानुसार एकूण १,०९५ जीबी डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस ऑफर केले जातात. Jio चा हा प्लॅन Disney + Hotstar, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud च्या सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लॅनमध्ये, Disney + Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे.