रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. भारतात सर्वात पहिल्यांदा ५ जी नेटवर्क रिलायन्स जिओने सुरू केले. जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. ज्यात ग्राहकांना अनेक फायदे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे देखील मिळतात. जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. जे वापरकर्ते ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट बघतात त्यांच्यासाठी हे प्लॅन फायदेशीर ठरू शकतात. या नवीन प्लॅनमध्ये झी ५, सोनी लिव्हसह येतात. आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये कंपनीने झी ५ आणि सोनी लिव्हचा समावेश केला आहे. कोणत्या प्प्ल्सनमध्ये याची फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.
जिओचा ३,६६२ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओने काही नवीन प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत. त्यातील पहिल्या प्लॅनची किंमत ही ३,३६२ रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. तसेच डेटा संपल्यानंतरचा स्पीड हा ६४ kbps इतका आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस, अनलिमिटेड ५ जी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि ३६५ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Sony LIV आणि झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे मिळणार आहेत. तसेच यामध्ये जीओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचा देखील समावेश आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
जिओचा ३,३२६ रुपयांचा प्लॅन
जिओने लॉन्च केलेल्या प्लॅनमधील सूर्य प्लॅनची किंमत ३,२२६ रुपये आहे. ज्यामध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतरच स्पीड हा ६४ kbps इतका आहे. या स्पीडमध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो. तसेच वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस, अनलिमिटेड ५ जी डेटा आणि दररोज १०० एसएमएस करता येतात. तसेच या प्लॅनची वैधता ३६५ दिवस इतकी आहे. यामध्ये सोनी लिव्ह, जीओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडचे फायदे मिळतात.
जिओचा ३,३२५ रुपयांचा प्लॅन
जिओने लॉन्च केलेल्या तिसऱ्या प्लॅनची किंमत ३,२२५ रुपये इतकी आहे. यामध्ये वापरकर्त्यांना २ जीबी डेटा वापरायला मिळतो. डेटा संपल्यानंतरचा स्पीड ६४ kbps होतो. या स्पीडवर वापरकर्त्यांना अनलिमिटेड डेटा मिळतो. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस करता येतात. तसेच ओटीटीमध्ये झी ५ चा लाभ मिळतो. तसेच यामध्ये जीओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड देखील वापरायला मिळते.