Reliance Jio ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन रिचार्ज लॉन्च करत असते. कंपनीने सर्वात पहिल्यांदा भारतात आपले ५जी नेटवर्क लॉन्च केले आहे.रिलायन्स जिओकडे ५६ दिवसांच्या वैधतेचे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. टेलिकॉम कंपनीचे हे परवडणारे प्लॅन्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. ५६ दिवसांचे प्लॅन्स हे असे नाही आहेत की जे सर्वच जणांना आवडू आवडू शकतात. मात्र तुमच्या बजेटमध्ये बसत असल्यास चांगल्या किंमतीच्या ऑफर्स असू शकतात.
जिओच्या ५६ दिवसांच्या वैधतेचे प्लॅन ५जी वेलकम ऑफरसह येतात. ज्याचा मूळ अर्थ असा आहे की, जिओकडून खरोखरच तुम्हाला ५जी अनलिमिटेड डेटा मिळतो. त्यासाठी आपण जिओच्या ५जी कव्हरेजच्या अंतर्गत असणे आवश्यक आहे. जिओच्या ५६ दिवसांच्या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
हेही वाचा : संधी सोडू नका! ‘हा’ आयफोन केवळ १२,७०० रूपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, येथे करा डिल
रिलायन्स जिओकडे विविध सेगमेंटमध्ये ५६ दिवसांच्या वैधतेचे प्रीपेड प्लॅन्स आहेत. ५३३, ५८९ , ४७१ आणि ५२९ रुपयांचे प्लॅन्स यामध्ये येतात. काही प्लॅन १.५ जीबी देतंत्र काही प्लॅन्स हे २ जीबी डेटासह येतात. तसेच काहींमध्ये JioSaavn Pro सबस्क्रिप्शनसह देखील येतात. जिओचा ५३३ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी दररोजचा डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस हे फायदे मिळतात. अतिरिक्त फायद्यांमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud यांचा समावेश आहे.
जिओच्या ५८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळतो. तसेच हा वापरकर्त्यांना JioSaavn Pro चे अतिरिक्त सबस्क्रिप्शन देखील प्रदान करते. यात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस हे फायदे देखील मिळतात. तसेच io वापरकर्त्यांना JioTV, JioCloud आणि JioCinema चे फायदे देखील मिळतात.
तसेच जिओच्या ५२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील ५६ दिवसांची वैधता मिळते. ज्यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस चे फायदे मिळतात. तसेच यात JioSaavn Pro, JioTV, JioCinema, JioCloud या अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे.