रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक डेटा प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. बहुतेक लोकं कमी खर्चात अधिक फायदे असलेल्या योजना शोधत आहेत. अशा परिस्थितीत, सर्वात लोकप्रिय असलेला दर दिवशी मिळणारा १.५ जिबी डेटा प्लॅन आहेत. वापरकर्त्यांना अशा योजनांचीही गरज असते ज्या केवळ स्वस्त नसून जास्तकाळ वैधता कालावधीसहही येतात. बाजारातील दोन प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्या जवळपास सारखेच १.५ जिबी दैनंदिन डेटा प्लॅन ऑफर करतात परंतु यात फायदे आणि ऑफर या भिन्न आहेत.
जिओ ५६ दिवसांचा प्लॅन
जिओ १.५ जिबी दैनंदिन डेटा प्रीपेड प्लॅनची मिड-टर्म ऑफर करते. वापरकर्ते प्रीपेड प्लॅन मिळवू शकतात ज्याची किंमत ४७९ रुपये आहे आणि ५६ दिवसांच्या वैधतेसाठी दररोज १.५ जिबी डेटा ऑफर करते. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि १०० एसएमएस/दिवस तसेच जिओ अॅप्लिकेशन्सचा प्रवेश देण्यात येत आहेत. जिओ अॅप्लिकेशन्समध्ये तुम्हाला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि आणखी काही समाविष्ट करण्यात आलेले आहे.
एअरटेल ५६ दिवसांचा प्लॅन
दुसरीकडे एअरटेलची मिड-टर्म प्लॅन किंमतीच्या बाबतीत जिओ सारखीच आहे. एअरटेल एक प्रीपेड प्लॅन ऑफर करते ज्याची किंमत ४७९ रुपये आहे आणि ५६ दिवसांच्या वैधतेसाठी १.५ जिबी/दिवस ऑफर करते. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस/दिवस मोबाइल एडिशन Amazon Prime Video मोफत ट्रायल आणि इतर काही फायदे आहेत.
जिओचा सर्वात आकर्षक प्लॅन
दोन्ही दूरसंचार कंपन्यांच्या प्लॅनची किंमत सारखीच आहे, पण यातील जिओच्या प्लॅन ऑफरमध्ये फरक आहे. कारण जिओची नमूद केलेली १.५ जिबी योजना त्याच्या JioMart Maha कॅशबॅक ऑफर अंतर्गत येते जी वापरकर्त्यांना योजनेवर २० टक्के सूट देते. अशा प्रकारे जिओचा प्रीपेड प्लॅन एअरटेलपेक्षा किंचित स्वस्त आहे.