अलिकडेच देशात ५ जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला आहे. त्यानंतर देशातील आघाडीच्या दूर संचार कंपन्यांनी काही मोजक्या शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे. ५ जी सेवा पुरवण्यात रिलायन्स जिओ आणि एअरटेल आघाडीवर आहे. दरम्यान यातील कोणती कंपनी डाउनलोडिंग स्पीड देत आहे, याचा खुलासा एका अहवालातून झाला आहे.
सध्या जिओ चार शहरांमध्ये ५ जी सेवा देत आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, वारणसी आणि कोलकत्ता या शहरांच्या समावेश आहे. कंपनी जियो फाइव्ह जी वेल्कम ऑफरच्या माध्यमातून काही मोजक्या ग्राहकांना १ जीबीपीएस अनलिमिटेड डाटा मोफत देत आहे. मात्र जिओ ५ जीची नेमकी स्पिड किती आहे याचा खुलासा एका अहवालातून झाला आहे.
(केवळ ३० मिनिटांत चार्ज होतो ONEPLUS चा ‘हा’ फोन, अमेझॉनवर मिळत आहे ६ हजारांची सूट, जाणून घ्या ऑफर)
ओकलाच्या स्पिडटेस्ट इन्टेलिजेन्स रिपोर्टनुसार, जिओ आणि एअरटेल हे आपली ५ जी सेवा तपासत असून त्यांना ८०९.९४ एमबीपीएस पर्यंत डाउनलोड स्पिड मिळत आहे. व्यावसायिक टप्प्यात आल्यानंतर स्पिड स्थिर होईल असे ओकलाचे म्हणणे आहे. ओकलाने एअरटेल आणि रिलायन्स या दोघांची ५ जी इंटरनेट स्पिड चेक केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये ही स्पिड चेक करण्यात आली.
१) दिल्लीमध्ये एअरटेलची सरासरी डाऊनलोड स्पिड ही १९७.९८ एमबीपीएस होती. त्या तुलनेत रिलायन्स जिओची सरासरी डाऊनलोड स्पिड स्पिड ही ५९८.५८ होती.
२) कोलकातामध्ये एअरटेलची सरासरी डाऊनलोड स्पिड ही ३३.८३ एमबीपीएस होती, तेच रिलायन्स जिओची सरासरी डाऊनलोड स्पिड ही ४८२.०२ एमबीपीएस होती.
३) मुंबईमध्ये एरटेलची सरासरी डाऊनलोड स्पिड २७१.०७ होती, तेच जिओची सरासरी डाऊनलोड स्पिड ही ५१५.३८ एमबी होती.
४) वारणसीमध्ये एअरटेलची सरासरी डाऊनलोड स्पिड ५१६.५७ एमबी होती, तेच जिओची स्पिड ४८५.२२ एमबी होती.
ओकलाच्या सर्व्हेनुसार भारतातील जवळपास ८९ टक्के स्मार्टफोन युजर्स हे ५ जी सेवा वापरण्यासाठी इच्छुक आहेत. भारतातील सध्याच्या नेटवर्कच्या तुलनेत ५ जी स्पिड ही फार चांगली असल्याचे निष्कर्षातून दिसून आले आहे. हे सुरुवातीचे निकाल असून त्याकडे सावधतेने पाहण्याची गरज आहे.