देशात ५ जी सेवा सुरू झाल्यानंतर रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन दूरसंचार कंपन्यांकडून काही निवडक शहरांमध्ये ५ जी सेवा दिली जात आहे. रिलायन्स जिओ मुंबई, दिल्ली, चेन्नई, वाराणसी, नाथद्वार आणि कोलकातामध्ये ५ जी सेवा देत आहे. आता यामध्ये आणखी दोन शहरांचा समावेश झाला आहे. आता रिलायन्सने बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरांमध्येही ५ जी सेवा सुरू केली आहे. माय जिओ अ‍ॅपवर आमंत्रण मिळाल्यानंतर या दोन्ही शहरांतील युजर्सना ५ जी सेवा वापरता येईल.

५ जी स्मार्टफोनच्या सहायाने युजरला जिओच्या ५ जी सेवेचा लाभ घेता येईल. फोन निर्मिती कंपन्यांनीही ५ जी सेवा सुरळीत वापरता यावी यासाठी आपल्या फोन्सना ५ अपडेट देणे सुरू केले आहे. रिल्यान्सने विशेष लाँच ऑफर देखील सादर केला आहे. जिओ काही पात्र युजर्सना ५०० ते १ जीबी प्रति सेकंद स्पीडसह अमर्यादित ५ जी डेटा वापरण्याची ऑफर देत आहे.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
new Thane railway station is being built between Thane and Mulund stations near psychiatric hospital
नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग, उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट

(भारतात TWITTER BLUE सेवा सुरू; दर महिन्याला किती पैसे खर्च करावे लागतील? जाणून घ्या)

जियो ५ जी सेवा मिळत असलेल्या शहरांमध्ये तुम्ही राहात असाल तर माय जिओ अ‍ॅपकडून तुम्हाला ५ जी वेल्कम ऑफरबाबत सूचना येईल. सूचना मिळूनही जर तुमचा फोन ५ जी नेटवर्कशी जोडला जात नसेल तर तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करून फोनमध्ये ५ जी नेटवर्क सुरू करू शकता.

  • फोनच्या सेटिंग्समध्ये जा.
  • मोबाईल नेटवर्कवर टॅप करा.
  • त्यानंतर जिओ सिम निवडा आणि ‘प्रिफर्ड नेटवर्क टाइप’वर टॅप करा.
  • यामध्ये तुम्हाला ३ जी, ४ जी, ५ जी हे पर्याय दिसून येतील. यातील ५ जी निवडा. यानंतर तुम्हाला फोनच्या डिस्प्लेवर वरच्या भागात ५ जीचे चिन्ह दिसून येईल.

नवीन सीम घेण्याची गरज नाही

दरम्यान ५ जी सेवा वापरण्यासाठी नवीन सीम घेण्याची गरज नसल्याचे जिओ आणि एअरटेलने स्पष्ट केले आहे. ५ जी सेवा सुरू झाल्यावर विद्यमान ४ जी सीम ५ जी सेवेशी जोडल्या जाईल.

Story img Loader