Reliance Jio ही भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांच्या इंटरनेट बाबतीत विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. ज्यामध्ये ८४ दिवसांची वैधता असलेले प्लॅन्समध्ये ग्राहकांना विविध आकर्षक प्लॅन मिळतत्. ज्यामध्ये भरपूर डेटा आणि इतर फायद्यांचा समावेश आहे. तसेच रिलायन्स जिओ हे देशातील पहिली टेलिकॉम कंपनी आहे जिने ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. तर जिओ आपल्या ग्राहकांना ८४ दिवसांमध्ये कोणकोणते प्लॅन्स ऑफर करते आणि त्यात कोणकोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स जिओचे ८४ दिवसांचे प्लॅन्स

जिओचा ९९९ रुपयांचा प्लॅन : जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा वापरायला मिळतो. तसेच तब्बल ४० जीबी डेटा बोनस म्हणून मिळतो. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करता येतात. तसेच जिओच्या प्लॅनमध्ये मूल्यवर्धित सेवांमध्ये JioSecurity, JioTV, JioCloud आणि JioCinema यांचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : ग्राहकांसाठी खुशखबर! Apple च्या ‘या’ प्रॉडक्ट्सवर फ्लिपकार्टवर मिळतोय भरघोस डिस्काउंट, एकदा ऑफर्स पहाच

जिओचा ९९९ रुपयांचा प्लॅन: जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचे फायदे मिळतात. तसेच सदस्यांना या प्लॅनमध्ये JioSaavn Pro, JioSecurity, JioTV, JioCloud आणि JioCinema चे फायदे मिळतात. त्यामुळे ग्राहकांना अधिक मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात.

जिओचा ७३९ रुपयांचा प्लॅन: रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी ८४ दिवसांच्या वैधतेमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करता येतात. ज्यांना इंटरनेटचा फार कमी आणि फार जास्त वापर करावा लागत नाही त्यांना हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. तसेच जिओ सदस्यांना JioSaavn Pro, JioSecurity, JioTV, JioCloud आणि JioCinema मध्ये प्रवेश मिळतो.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह ७ जुलैला लॉन्च होणार Samsung चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, काय असू शकतात फीचर्स

जिओचा ७१९ रुपयांचा प्लॅन: ७१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळतो. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा या प्लॅनमध्ये मिळते. सदस्य जिओच्या इतर सेवांमध्ये घेऊ शकतात. ज्यामध्ये JioSecurity, JioTV, JioCloud आणि JioCinema यांचा समावेश आहे.

जिओचा ६६६ रुपयांचा प्लॅन: दररोज १.५ जीबी डेटा , अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, दररोज १०० एसएमएस या सुविधा या प्लॅनमध्ये मिळतात. तसेच ioSecurity, JioTV, JioCloud आणि JioCinema मध्ये प्रवेश मिळतो.

जिओचा ३९५ रुपयांचा प्लॅन: जिओच्या या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी ६ जीबी डेटा कंपनी देते. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि १००० एसएमएस करण्याची सुविधा यामध्ये मिळते. तसेच JioSecurity, JioTV, JioCloud, and JioCinema चा आनंद घेऊ शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio 84 days prepaid plans validity jio cloud and jio security unlimited call 100 sms and bonus deta check all plans tmb 01
First published on: 28-06-2023 at 10:18 IST