रिलायन्स जिओने काल आपले जिओ एअरफायबर लॉन्च केले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या कंपनीच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली होती. जिओ एअर फायबर ही एक वायरलेस वाय फाय सेवा आहे. घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणार आहे. जिओ एअर फायबरच्या येण्यामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ एअरफायबर सध्या अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकाता, मुंबई व पुणे या ८ शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दुर्गम भागांमध्ये इंटरनेट देण्याबरोबरच जिओ फायबर एचडीमध्ये वापरकर्त्यांना ५५० पेक्षा जास्त डिजिटल टीव्ही चॅनेल ऑफर करणार आहे. ज्यामध्ये नेटफ्लिक्स, डिस्नी+ हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी ५ , जिओसिनेमा आणि SunNXT , Hoichoi, डिक्सव्हरी प्लस, युनिव्हर्सल प्लस, अल्ट बालाजी, Eros Now, Lionsgate Play, शेमारूमी Docubay आणि एपिकव सारखे १६ ओटीटी App मोफत मिळणार आहेत. कंपनी कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय वाय फाय राउटर, ४ के स्मार्ट सेट अप टॉप बॉक्स आणि व्हॉइस रिमोट देखील देणार आहे. याबाबतचे वृत्त The Indian Express ने दिले आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?

हेही वाचा : Best Smartphones Under 12000: १२ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट ५ जी स्मार्टफोन्स; ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…

Image Credit- Reliance Jio

जिओ एअरफायबरचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ५९९ रुपयांचा आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ३० mbps चा स्पीड आणि १४ ओटीटी Apps ऑफर करण्यात येतो. तुम्हाला जर का अधिक स्पीड हवा असल्यास तुम्ही ८९९ रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. यात मिळणारे लाभ हे ५९९ रुपयांच्या प्लानप्रमाणेच आहेत. मात्र स्पीड हा १०० mbps इतका मिळतो. ज्या वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स, Amazon प्राइम आणि जिओसिनेमा प्रीमियम हवे आहे त्यांच्यासाठी कंपनीने १,१९९ रुपयांचा प्लॅन आणला आहे. ज्यात १०० mbps स्पीड आणि अनलिमिटेड डेटा व ५५० पेक्षा जास्त चॅनेल्सचे फायदे मिळतात.

जिओ एअरफायबर मॅक्स प्लॅन हा १,४९९ रुपयांचा असून हा पॉकेट फ्रेंडली प्लॅन आहे. हा महिन्याला ३०० mbps चा स्पीड ऑफर करतो. तथापि, २,४९९ आणि ३,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जास्त करून ५०० mbps आणि १००० mbps चा स्पीड मिळतो. मात्र हे केवळ निवडक ठिकाणी उपलब्ध आहे.

हेही वाचा : रिलायन्स जिओ, एअरटेलपेक्षा BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो दररोज ३ जीबी डेटा, जाणून घ्या

जिओ एअरफायबरचे कनेक्शन कसे घ्यावे ?

जिओ एअरफायबर कनेक्शन घेण्यासाठी तुम्ही ६०००८-६०००८ या नंबरवर मिस कॉल देऊ शकता. जिओ वेबसाइटवर जाऊन किंवा जवळच्या जिओ स्टोअरवर जाऊ शकता. तुमच्या टेरेसवर किंवा घराबाहेर एक आउटडोअर युनिट स्थापित करेल ज्याची किंमत १,००० रुपये असेल. मात्र तुम्ही वार्षिक प्लॅन निवडला ते शुल्क माफ केले जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे.