सध्या भारतामध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया अशा तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. यामधील जिओ आणि एअरटेल या दोन टेलिकॉम कंपन्यांनी देशामध्ये आपले ५जी नेटवर्क सुरू केले आहे. व्हीआयला अजून आपले ५जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही. मात्र ते लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. जर का तुम्हाला पोस्टपेड कनेक्शन हवे असेल पण ते खूप महाग वाटत असेल तर तुम्ही एकदा जिओ, एअरटेल आणि व्हीआयचे एंट्री लेव्हल प्लॅन्स पाहणे आवश्यक आहे.

आज आपण ती भारतीय खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्सच्या एंट्री लेव्हल पोस्टपेड प्लॅन्स पाहणार आहोत. पोस्टपेड म्हणजे बिल आल्यावर पैसे भरायचे असतात. तर तिन्ही कंपन्यांचे पॉकेट फ्रेंडली पोस्टपेड प्लॅन्स कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Zee Marathi Lakshmi Niwas Serial New Entry
Video : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! साकारणार ‘ही’ भूमिका, जबरदस्त प्रोमो आला समोर
sunny leone
Sunny Leone News : सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क सनी लिओनीचे नाव; महिन्याला मिळत होते हजार रुपये
Image of an airplane
Surat Bangkok Flight : सुरतहून बँकॉकला गेलेल्या पहिल्याच विमानात प्रवासी प्यायले दोन लाखांची १५ लिटर दारू
Paaru
Video: पारू-आदित्यमधील जवळीक वाढणार, अनुष्का दोघांची अहिल्याकडे तक्रार करणार, पाहा प्रोमो

हेही वाचा : VIDEO: अखेर तारीख ठरली! ‘या’ दिवशी Realme लॉन्च करणार आपले दोन भन्नाट स्मार्टफोन्स, काय असणार विशेष?

रिलायन्स जीओचा पोस्टपेड प्लॅन

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या रिलायन्स जिओकडे २९९ रुपयांचा एक पोस्टपेड प्लॅन आहे. जो सर्वात परवडणारा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३० जीबी डेटा मिळतो. त्यानंतर तुम्हाला डेटा हवा असल्यास अतिरिक्त डेटासाठी १० रूपये आकारले जातात. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. जिओसिनेमा, जिओक्लाउड आणि जीओटीव्ही असे अतिरिक्त फायदे मिळतात. वापरकर्ते या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा प्राप्त करण्यास देखील पात्र आहेत.

भारती एअरटेलचा पोस्टपेड प्लॅन

भारती एअरटेलचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे जो एंट्री लेव्हल प्लॅन आहे. यात वापरकर्त्यांना ४० जीबी डेटा वापरायला मिळतो. जिओच्या २९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये मिळतो त्यापेक्षा अतिरिक्त डेटा या प्लॅनमध्ये वापरायला मिळतो. अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला एअरटेल थँक्स App वॉर जावे लागेल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे देखील मिळतात.

वोडाफोन-आयडियाचा पोस्टपेड प्लॅन

वोडाफोन-आयडियाची सर्वात परवडणारा पोस्टपेड प्लॅन आहे तो म्हणजे ४०१ रूपयांचा. ३९९ रूपयांचा एंट्री लेव्हलची किंमत बदलून ४०१ रूपये करण्यात आली आहे. यामध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, ३००० एसएमएस आणि ५० जीबी डेटा वापरायला मिळतो. तुम्हाला रात्री १२ ते ६ पर्यंत अनलिमिटेड डेटा, व्हीआय मुव्हीज आणि व्हीआय गेम्स असे अतिरिक्त फायदे मिळतात.

Story img Loader