Reliance Jio Airtel new prepaid plans Compared: रिलायन्स जिओ आणि एअरटेल या देशातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. जिओ आणि एअरटेलने अलीकडेच स्वातंत्र्य दिन ऑफर अंतर्गत त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड योजना लॉंच केल्या आहेत. Airtel ने ५१९ रूपये आणि ७७९ रूपयांचे रिचार्ज पॅक दिले आहेत. रिलायन्स जिओने ७५० रुपयांचा नवीन प्लॅन सादर केला. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओने २,९९९ रुपयांचा प्लॅन नवीन ऑफरसह सादर केला आहे. एअरटेल आणि जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये काय ऑफर आहे ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हे प्लॅन्स एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत? जाणून घ्या.

एअरटेलचा ५१९ रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या ५१९ रुपयांच्या नवीन प्लॅनची ​​वैधता ६० दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस ऑफर केले जातात. याशिवाय एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. म्हणजेच, ग्राहकाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड STD, लोकल आणि रोमिंग कॉलची सुविधाही आहे.
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी मोफत Apollo 24/7 Circle सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय Hello Tunes आणि Fastag वर १०० रुपयांची कॅशबॅक ऑफर देखील आहे.

एअरटेलचा ७७९ रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा ७७९ रुपयांचा प्लॅन ९० दिवसांच्या वैधतेसह लॉंच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉईस कॉल्स देखील मिळतात. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील मिळतात.

एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कलची मोफत सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये Fastag वर मोफत हॅलो ट्यून आणि १०० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतो.

आणखी वाचा : Vivo Y22s स्मार्टफोनची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, ५० MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही….

७५० रुपयांचा रिलायन्स जिओ प्लॅन
रिलायन्स जिओचा हा प्लान ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. जिओने हा प्लॅन स्वातंत्र्य दिनानिमित्त लॉंच केला आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात.

७५० रुपयांच्या प्लॅनमध्ये, Jio एकाच वेळी दोन प्लॅन ऑफर करत आहे. एकाची किंमत ७४९ रुपये आणि दुसरीची १ रुपये.
पहिल्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, २ GB डेटा, अनमिलिटेड व्हॉइस कॉल, १०० SMS दररोज ७४९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. त्याची वैधता ९० दिवसांची आहे.

दुसरीकडे, इतर १ रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर त्यात १०० एमबी डेटा उपलब्ध आहे, ज्याची वैधता ९० दिवस आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये JioSecurity, JioTV आणि JioCinema सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : ५४ MP ट्रिपल रियर कॅमेराचा Honor 70 5G स्मार्टफोन लॉंच, किंमत आणि सर्व डिटेल्स जाणून घ्या

रिलायन्स जिओच्या २,९९९ रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. हा प्रीपेड पॅक अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह येतो. म्हणजेच ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर स्थानिक, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात.

जिओ इंडिपेंडन्स ऑफर अंतर्गत, ग्राहकांना या प्लॅनमध्ये ३००० रुपयांचे फायदे देखील मिळू शकतात. यामध्ये ७५ GB अतिरिक्त डेटा, Ajio, Netmeds आणि Ixigo कडील कूपनचा समावेश आहे. Jio च्या या रिचार्ज पॅकमध्ये ४९९ रुपयांचे मोबाइल सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे.

Story img Loader