कुटुंबातील जवळजवळ प्रत्येकजण स्मार्टफोनमध्ये डेटा आणि OTT प्लॅटफॉर्म वापरतो. अशा परिस्थितीत प्रत्येकासाठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन खरेदी करणे खूप महाग होते. तर तुम्हाला अशाच काही उत्तम योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला एकाच प्लॅनमध्ये पाच लोकांसाठी आश्चर्यकारक फायदे मिळतील. चला या योजनांवर एक नजर टाकूया.
व्होडाफोन आयडिया Redx Plan
व्होडाफोन आयडिया कंपनीने एक कौटुंबिक पोस्टपेड योजना ऑफर करते ज्यामध्ये तुम्हाला २,२९९ रुपयांमध्ये एकाच वेळी पाच सदस्यांसाठी कनेक्शन मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्राथमिक आणि दुय्यम कनेक्शनसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दरमहा ३००० एसएमएस आणि अमर्यादित डेटा मिळेल.
या प्लॅनमध्ये युजर्सना टीव्ही आणि मोबाईलवर नेटफ्लिक्सचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळू शकते. या प्लॅनमध्ये १,४९९ रुपयांचे एक वर्षाचे अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन तसेच ४९९ रुपयांच्या किमतीचे एक वर्षाचे Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील आहे. याशिवाय या RedX प्लॅनवर तुम्हाला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्येही प्रवेश मिळतो.
जिओ फॅमिली पोस्टपेड प्लॅन
सर्वप्रथम जिओच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगायचे झाल्यास , ज्याची किंमत ९९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये आणखी तीन सिम कार्ड दिले आहेत आणि यामध्ये तुम्हाला एकूण २००जिबी इंटरनेट सोबत ५०० जिबी रोलओव्हर डेटा सुविधा दिली जात आहे. जर तुम्ही तुमचे २००जिबी इंटरनेट संपवले तर तुम्हाला १० रुपये प्रति जीबी दराने अधिक डेटा मिळेल.
कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसच्या सुविधेसह, या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि इतर अनेक OTT प्लॅटफॉर्म्सचे सदस्यत्व एका वर्षासाठी मिळेल.
एअरटेल प्रीमियम फॅमिली पोस्टपेड प्लॅन
आता एअरटेलच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगायचे झाल्यास, ज्यामध्ये तुम्हाला १,५०० रुपयांच्या बदल्यात अनेक आश्चर्यकारक फायदे दिले जात आहेत. हा प्लॅन घेतल्यावर वापरकर्त्यांना नियमित सिम आणि कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य अॅड-ऑन नियमित व्हॉइस कनेक्शन देण्यात येतील. या प्लॅनच्या मूलभूत फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला २०० जिबी डेटासह ५०० जिबी रोलओव्हर डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस सेवा मिळवता येणार आहे. ही योजना २०० ISD मिनिटे आणि IR पॅकवर १० टक्यांची सूट देखील मिळेल.
या प्लॅनमध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे सदस्यत्व एक वर्षासाठी तसेच Disney+Hotstar VIP सदस्यत्व एक वर्षासाठी समाविष्ट आहे. इतर फायद्यांमध्ये एअरटेल एक्स-स्ट्रीम अॅप प्रीमियम, विंक प्रीमियम आणि बरेच काही समाविष्ट आहे.