सध्या देशामध्ये Reliance Jio, Airtel आणि vi या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. यामध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन टेलिकॉम कंपन्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक रीचार्ज प्लॅन्स आणत असतात. आज आपण जिओ आणि एअरटेल यांचे ५०० रुपयांच्या आतमध्ये असणारे काही पोस्टपेड प्लॅन पाहणार आहोत. ज्यामध्ये अतिरिक्त फायदे देखील तुम्हाला मिळतात.

एअरटेलचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

एअरटेलचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. ज्यामध्ये ४० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग (स्थानिक,std आणि रोमिंग) मिळतो. दररोज १०० एसएमएस करायला मिळतात. तसेच एअरटेल कंपनी ग्राहकांना Airtel Thanks रिवॉर्ड ऑफर करते. मात्र हे प्लॅनमध्ये कंपनी कोणतेही मोफत फॅमिली अॅड-ऑन किंवा OTT सबस्क्रिप्शन देत नाही.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा : ChatGpt वरील हिस्ट्री डिलीट करायची आहे ? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

एअरटेलचा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

एअरटेलच्या या ४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा , अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि Airtel Thanks रिवॉर्ड मिळतो. OTT वर ६ महिन्यांसाठी Amazon प्राइमची मेंबरशिप , १ वर्षासाठी मोबाईलचे Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शन , Wynk प्रीमियम आणि बरेच फायदे यामध्ये मिळतात. मात्र या प्लॅनमध्ये कंपनी कोणतेही मोफत फॅमिली अॅड-ऑन किंवा OTT सबस्क्रिप्शन देत नाही.

जिओचा २९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज १ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनमध्ये जिओच्या ग्राहकांना Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud यासह Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जर का तुमच्याकडे ५ जी सिमकार्ड असेल तर तुम्हाला अनलिमिटेड ५ जी डेटाकहा लाभ घेत येऊ शकतो. मात्र या प्लॅनमध्ये कंपनी कोणतेही मोफत फॅमिली अॅड-ऑन किंवा OTT सबस्क्रिप्शन देत नाही.

हेही वाचा : Weekly Tech Updates: Samsung कडून ChatGpt बॅन ते भारतात १४ अ‍ॅप्सवर बंदी; जाणून घ्या टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस असे फायदे मिळतात. मासिक डेटा संपला तर तुम्ही प्रत्येकी १० रुपये देऊन १ जीबी डेटा खरेदी करू शकता. या प्लॅनमधील अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio वापरकर्त्यांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud यासह Jio अॅप्समध्ये प्रवेश मिळतो.

५०० रुपयांच्या आतमध्ये असणाऱ्या पोस्टफेड प्लॅनमध्ये जिओ आणि एअरटेल यांच्यातील कोणता प्लॅन चांगला आहे ? याचा विचार केला असता दोन्ही कंपन्या ५०० रुपयांच्या आतील प्लॅन्समध्ये समान फायदे देतात. तरीसुद्धा दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्समध्ये थोडा फार फरक असण्याची शक्यता आहे.