रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशामध्ये सर्वात पहिल्यांदा आपले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. रिलायन्स जिओ भारतात आपला ७ व वर्धापन दिन साजरा करत आहे. जिओ ७ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रीपेड वापरकर्त्यांसाठी काही ऑफर्स घेऊन आले आहे. जिओ आपल्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त देत असलेल्या ऑफरमध्ये अतिरिक्त डेटा, शॉपिंग व्हाउचर आणि अन्य काही ऑफर करते. या ऑफर्सची मर्यादा भारतात ५ ते ३० सप्टेंबरपर्यंत असणार आहे. जिओ ७ व्या वर्धापन दिनामित्त प्रीपेड प्लॅन्सवर कोणकोणत्या ऑफर्स देत आहे ते जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओचा ७ वा वर्धापनदिन : किंमत आणि फायदे
रिलायन्स जिओचा एक २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये जिओ अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएससह दररोज २ जीबी डेटा ऑफर करते. याची वैधता २८ दिवसांसाठी असणार आहे. वर्धापनदिनाच्यानिमित्त या प्लॅनमध्ये ग्राहकांना ७ जीबी इतका अतिरिक्त डेटा मिळणार आहे.
रिलायन्स जिओच्या ७४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्याने दररोज २ जीबी डेटा , अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज १०० एसएमएस करण्याचा फायदे मिळतात. या प्लॅनची वैधता ९० दिवस म्हणजेच तीन महिने इतकी आहे. वर्धापनदिनाच्या ऑफरनुसार वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये १४ जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : iPhone खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार करा
जिओच्या २,९९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएससह दररोज २.५ जीबी डेटा वापरकर्त्यांना मिळतो. याची वैधता ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष इतकी आहे. ऑफरनुसार, खरेदीदारांना या प्लॅनमध्ये २१ जीबी अतिरिक्त डेटा, Ajio वर २०० रुपयांचा डिस्काउंट, नेटमेड्सवर २० टक्के डिस्काउंट, स्वीगीवर १०० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. रिलायन्स डिजिटलवर १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. हॉटेल्सवर १५ टक्के आणि फ्लाईट्सवर १,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. रिलायन्स जिओने अलीकडेच AGM मध्ये जिओ फायबर लॉन्च केले आहे. नवीन एअरफायबर सेवा १९ सप्टेंबरपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून उपलब्ध होणार आहे.