Reliance Jio Postpaid plan: Relaince Jio ही देशातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेली टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओची ५ जी सर्व्हिस देखील भारतातील १८४ शहरांपेक्षा अधिक शहरांमध्ये सुरु झाली आहे. तसेच या टेलिकॉम कंपनीचे देशभरात सर्वात जास्त वापरकर्ते आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स लॉन्च करतच असते.
रिलायन्स जिओकडे प्रीपेड प्लॅन्सशिवाय अनेक पोस्टपेड प्लॅन्स आहेत.OTT पोस्टपेड प्लॅनमध्ये जिओ वापरकर्त्यांना अॅक्सेस देखील मोफत मिळतो. जर का तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात कंटेन्ट पाहण्याची आवड असेल आणि त्यासाठी तुम्हाला वेगळी मेंबरशिप घ्यायची नसेल तर तुम्ही जिओचा पोस्टपेड प्लॅन घेऊ शकता. मुकेश अंबानींच्या मालकीची असलेल्या रिलायन्स जीवच सर्वात स्वस्त प्लॅन हा ३९९ रुपयांपासून सुरु होतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेऊयात.
हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओच्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळणार डेली १.५ जीबी डेटा, जाणून घ्या
जीओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना ७५ जीबी हायस्पीड डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनमध्ये २०० जीबी पर्यंत डेटा रोलओव्हर करण्याची सुविधा वापरकर्त्यांना मिळते. याचा अर्थ असा की, जर ग्राहक या प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या डेटा प्लॅनमधील संपूर्ण डेटा खर्च करू शकत नसतील तर उर्वरित देता हा पुढील महिण्याच्या प्लॅनमध्ये समाविष्ट केला जाईल. तसेच प्लॅनमधील डेटा संपला तर ग्राहक १० रुपये प्रति जीबी असा डेटा वापरू शकतात.
याशिवाय जिओ या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॅल्सची सुविधा देते. म्हणजेच ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड स्तहनिक आणि एसटीडी कॉल्स करू शकतात. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस करता येणार आहेत. तसेच ३९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये इतर अनेक फायदे तुम्हाला मिळतात. Netflix (मोबाइल प्लॅन), Amazon Prime, JioTV, JioSecurity, JioCloud यासारख्या सुविधा ग्राहकांना मोफत मिळतात. यामधील amazon prime ची मेंबरशिप ही १ वर्षासाठी आहे. जर तुम्ही जिओच्या ५जी सेवेचा लाभ घेत असाल म्हणजेच ती सेवा वापरत असाल तर या प्लॅनसह तुम्ही ५जी डेटा वापरू शकता.