Reliance Jio Cheapest Recharge Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या स्वस्त आणि परवडाणाऱ्या रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. जिओ आपल्या ग्राहकांसाठी कित्येक प्रकारचे परडवणारे रिचार्ज प्लॅन देत असते. आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनी स्वस्त प्लॅनसोबत जास्त दिवसांची वैधता, डेटा आणि कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिपशन देत असते. आज आम्ही तुम्हाला जीओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबाबत सांगणार आहोत जो अगदी बजेट फ्रेडली आहे.

हा प्लॅन त्या जिओफओन कस्टमर्ससाठी सर्वोत्तम प्लॅन आहे जे अशा स्वस्त आणि पडवणारे प्लॅनच्या शोधात असतात. यामध्ये जिओ ग्राहकांना कॉलिंग, फ्रि एसमएस आणि जास्त दिवसांची वैधताचा फायदा मिळेल. तर या प्लॅनबाबत अधिक जाणून घेऊ या

How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rupee continues to decline against dollar print eco news
रुपया ८५.८७ च्या गाळात!
highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?
Ather 450 features and price
Ather 450 सीरिजचा नवा अंदाज, जबरदस्त कलर ऑप्शन अन् नवे फीचर्स; जाणून घ्या किंमत
Half percent interest rate reduction
कर्ज स्वस्त होणार; रिझर्व्ह बँकेकडून सहामाहीत अर्धा टक्के व्याज दरकपात शक्य
hyundai creta electric features specifications and price in marathi
TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
RBI introduces beneficiary account name look-up facility to secure digital transactions.
RTGS, NEFT Transactions : आता चुकूनही जाणार नाहीत चुकीच्या खात्यात पैसे, NEFT आणि RTGS वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयचे मोठे पाऊल

जिओ ग्राहकांसाठी हे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहेत.

जिओफोन ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या जिओ स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये रु. ७५, रु. ९१, रु. १२५, रु १५२ आणि रु. १८६चे प्लॅन आहेत. होय, तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल आणि तुम्हाला या जिओ रिचार्ज पॅकबद्दल क्वचितच माहिती असेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस आणि डेटासोबत अनेक फायदे मिळतात.

रिलायन्स जिओ जिओफोन ग्राहकांसाठी ७५ रुपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनची वैधता २३ दिवसांची आहे. तसेच ०.१ एमबी दैनिक इंटरनेट आणि एकूण २०० एमबी अतिरिक्त डेटा (२.५जीबी डेटा) मिळतो. याशिवाय, तुम्ही सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि ५० मोफत एसएमएस देखील घेऊ शकता.

हेही वाचा – BSNLचा नवा प्लॅन! 49 रुपयांच्या एका रिचार्जमध्ये मिळणार सात ओटीटी अ‍ॅप्स, असा घ्या सुविधेचा लाभ

याशिवाय जिओ आपल्या ग्राहकांना नवीन परवणारे प्लॅन देत आहे. या जिओ प्लॅनची किंमत इतकी कमी आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही. येथे आम्ही जिओ फोन युजर्ससाठी उपलब्ध असलेले सर्व रिजार्च प्लॅनबाबत सांगणार आहोत.

जिओ ९१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा ९१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज ०.१ एमबी डेटा दिला जातो. याशिवाय, तुम्हाला २०० एमबी अतिरिक्त डेटा देखील दिला जातो. जिओच्या या प्लॅनमध्ये जिओफोन ग्राहकांना एकूण ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह मोफत ५० एसएमएसचा लाभ घेता येतो.

जिओ १२५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या १२५ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २३ दिवसांच्या वैधतेसह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि०.५ एमबी डेटा दररोज दिला जातो. यासोबत तुम्ही मोफत ३०० एसएमएसचा लाभ घेऊ शकता.

हेही वाचा – Instagramवर आलं भन्नाट फिचर, आता कमेंट करणे होणार आणखी मजेशीर, कसं ते जाणून घ्या

जिओचा १५२ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या प्लॅनमध्ये, जिओ फोन ग्राहकांना सर्व समान फायदे मिळतात, जे१२५ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिले जातात.पण, या दोन प्लॅनमधला फरक एवढाच आहे की जिओचा १५२ रुपयांचा रिचार्ज प्लॅन २३ दिवसांऐवजी २८ दिवसांच्या वैधतेसह येतो.

जिओ १८६ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओ फोन वापरकर्त्यांसाठी हा प्लान सर्वोत्तम मानला जातो. २८ दिवसांची वैधता असलेला हा जबरदस्त प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच मोफत १०० एसएमएस आणि दररोज १ जीबी डेटा देखील उपलब्ध आहे.

Story img Loader