Reliance Jio Prepaid cheapest Recharge Plan: रिलायन्स जिओकडून नेहमीच चांगली बातमी येत असली तरी आता जिओ यूजर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. जिओने आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला आहे.
जिओने कोणता प्लॅन केला बंद?
जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या यादीतून ११९ रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. ज्या वापरकर्त्यांना थोड्या काळासाठी डेटा आणि वैधता हवी होती त्यांच्यासाठी ही योजना खूप फायदेशीर होती. Jio चा ११९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आतापर्यंत कंपनीचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन होता पण आता यूजर्स त्याचा फायदा घेऊ शकणार नाहीत. जिओने हा प्लॅन संपवला आहे.
(हे ही वाचा: केवळ ३,९९९ रुपयांमध्ये iPhone 14 खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय मोठा डिस्काउंट)
११९ रुपयांमध्ये Jio यूजर्सना उत्तम ऑफर्स मिळत होत्या. यामध्ये कंपनी ग्राहकांना एकूण १४ दिवसांची वैधता देत असे. यासोबतच दररोज १.५GB डेटा देण्यात येत होता. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध होते. यामध्ये कंपनीला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही मिळाला आहे.
आता स्वस्त प्लॅनसाठी किती खर्च करावा लागेल?
आता स्वस्त प्लॅनसाठी वापरकर्त्यांना १४९ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज १GB डेटा मिळतो. ११९ रुपयांच्या प्लॅनपेक्षा कमी डेटा देत असला तरी त्याची वैधता अधिक आहे. १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २० दिवसांची वैधता मिळते.