देशभरात रिलायंस जिओची इंटरनेट सेवा खंडीत झाली आहे. जिओ फायबर वापरणाऱ्यांनाही जिओ डाऊनचा सामना करावा लागत आहे. यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सोशल मीडियासाठी जिओ इंटरनेट वापरण्याऱ्या वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

WhatsApp, Instagram, X, Snapchat, YouTube आणि Google यासारख्या सोशल मीडिया अॅप्स सुरू होताना अडचणी निर्माण होत आहेत.. Downdetector नुसार, ५२ टक्क्यांहून अधिक तक्रारदारांना मोबाइल इंटरनेट, ३८ टक्के जिओ फायबर आणि ७ टक्के मोबाइल नेटवर्कमध्ये व्यत्यय येत आहेत.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pimpri Chinchwad is disconnecting water supply to properties with overdue water bills
पिंपरी : नळजोड तोडणीबाबतचा ‘एसएमएस’ खरा की खोटा? महापालिका प्रशासनाने सांगितले…
A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
CBSE instructed affiliated schools to publish staff and other information on their websites
संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा

कस्टमर केअर सेवाही बंद

दरम्यान, याबाब डाऊनबाबत जिओच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधला असता तिथून प्रतिसाद दिला जात नसल्याच्याही तक्रारी वापरकर्त्यांनी केल्या आहेत. वापरकर्त्याने लिहिले, “इंटरनेटचा वेग खूपच कमी झाला आहे आणि जेव्हा मी ग्राहक समर्थनाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कॉल बंद केला.” काही सोशल मीडिया यूजर्सने मीम्स शेअर करून रिलायन्स जिओची खिल्ली उडवली आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर जिओ डाऊनच्या तक्रारी अजूनही पडत आहेत. त्यामुळे ही सेवा कधी पूर्ववत होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दरम्यान, रिलाईन्स जिओची इंटरेट सेवा खंडित असतानाही रिलायन्सकडून याबाबत कोणतंही अधिकृत निवेदन अद्यापही आलेलं नाही. गेल्या तीन तासांपासून ही सेवा खंडित झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केल आहे.

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचा संताप

“मी घरून काम करत असल्याने, मी एक मजबूत कनेक्टिव्हिटी सिस्टम ठेवतो. दुर्दैवाने, जिओ फायबरने मला निराश केले आहे. घरातील जिओ फायबर (केबलद्वारे) काम करत नाही, जिओ मॉडेम काम करत नाहीत, अगदी जिओ मोबाइल नेटवर्क इंटरनेटही खराब आहे”, अशी तक्रार एका ग्राहकाने केली आहे.

Story img Loader