एअरटेलने या आठवड्यात आपले नवीन ‘ऑल-इन-वन’ ब्रॉडबँड प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीने ६९९ ते १,५९९ रुपयांच्या दरम्यान ३ प्लॅन लॉन्च केले आहेत. एअरटेलच्या या प्लॅन्समध्ये ३०० हून अधिक टीव्ही चॅनेल आणि OTT सेवा दिल्या जात आहेत. एअरटेल ६९९ रुपयांच्या बेस प्लानमध्ये 40Mbps प्लॅन ऑफर करते. जर आपण एअरटेलच्या या प्लॅनची तुलना रिलायन्स जिओ एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅनशी केली, तर कंपनी ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत 30Mbps स्पीडने इंटरनेट ऑफर करते. रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या सर्व-इन-वन ब्रॉडबँड प्लॅनची तुलना करूया:

एअरटेलचा ६९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
एअरटेलचा ६९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन 40Mbps स्पीडसह 3.3TB डेटा ऑफर करतो. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे. Airtel च्या या प्लॅनमध्ये, Disney + Hotstar, Extreme Premium (SonyLiv, LionsGate, Eros Now इ.) सह एकूण १५ OTT सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत. ३०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे टीव्ही चॅनेल आणि एअरटेल थँक्स फायदे देखील प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fair Play Betting App Case, ED , ED seizes assets ,
फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरण : ईडीकडून आतापर्यंत ३४४ कोटींच्या मालमत्तेवर टाच
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
Tadoba online booking scam officials questioned three months ago
ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा, तीन महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांची चौकशी

आणखी वाचा : Gmail Backup: जीमेल खात्यावरील संपूर्ण डेटा डाउनलोड करू शकता, जाणून घ्या पद्धत

एअरटेलचा १,५९९ ब्रॉडबँड प्लॅन
एअरटेलच्या १,५९९ रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ग्राहकांना 300Mbps स्पीडने अनलिमिटेड डेटा, व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar, Sony Liv सारख्या १७ OTT अ‍ॅप्सचा लाभ घेता येतो. याशिवाय ३५० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या टीव्ही चॅनेलचे सबस्क्रिप्शनही मोफत आहे.

एअरटेलचा १,०९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
एअरटेलचा १०९९ रूपयांचा प्लॅन 200Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळतंय. या प्लॅनमध्येही ग्राहक ३५० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे टीव्ही चॅनल मोफत पाहू शकतात. या प्लॅनमध्ये Amazon Prime, Disney + Hotstar, Xtreme Premium आणि Airtel Thanks देखील दिलेले आहेत.

आणखी वाचा : Airtel यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३ दिवस मोफत इंटरनेट डेटा, जाणून घ्या ऑफरबद्दल

JioFiber चा ४९९ रुपयांचा प्लॅन
जिओच्या ४९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ३९९ रुपये बेस प्लॅन म्हणून घेतले जातात तर १०० रुपये ओटीटी चार्ज म्हणून घेतले जातात. या प्लॅनमध्ये 30Mbps च्या स्पीडमध्ये अनलिमिटेड डेटा आणि व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. जिओचा हा प्लॅन ६ OTT सबस्क्रिप्शन ऑफर करतो, ज्यात युनिव्हर्सल +, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play यांचा समावेश आहे.

JioFiber ची ५९९ रुपयांचा प्लॅन
जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये बेस प्लॅन म्हणून ३९९ रुपये आणि ओटीटी चार्ज म्हणून २०० रुपये आकारले जातात. प्लॅनमध्ये 30Mbps च्या स्पीडमध्ये अनलिमिटेड डेटा उपलब्ध आहे. अनलिमिटेड कॉलिंग देखील मोफत आहे. परंतु या प्लॅनमध्ये १२ OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे ज्यात Disney + Hotstar, Sony Liv, Zee5, Voot Select, Voot Kids यांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ सेट-टॉप बॉक्सचा पर्यायही आहे.

आणखी वाचा : ८००० रुपयांपेक्षा कमी किमतीचा ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करायचाय? मग हे ५ ऑप्शन्स एकदा पाहा

JioFiber ७९९ रुपयांचा प्लॅन
७९९ रुपयांच्या JioFiber प्लॅनमध्ये 100Mbps स्पीड उपलब्ध आहे. यामध्ये बेस प्लॅनसाठी ६९९ रुपये आणि OTT अ‍ॅप्ससाठी १०० रुपये आकारले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६ OTT अ‍ॅप्सचा लाभ मिळतो. JioFiber ग्राहकांना या प्लॅनमध्ये Jio सेट-टॉप बॉक्सची सुविधा मिळते.

JioFiber ची ८९९ रुपयांचा प्लॅन
८९९ रुपयांच्या जिओ फायबर प्लॅनमध्ये बेस प्लॅनसाठी ६९९ रुपये आणि ओटीटी चार्जेससाठी २०० रुपये आकारले जातात. या प्लॅनमध्ये कंपनी १२ OTT सेवांचे सबस्क्रिप्शन देते. पण या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील मोफत आहे. जिओ फायबरचे सदस्य Jio सेट-टॉप बॉक्स देखील निवडू शकतात.

JioFiber १,४९९ रुपयांचा प्लॅन
Jio Fiber च्या १,४९९ रूपयंच्या प्लॅनला १,५९९ च्या Airtel Extreme प्लॅनची स्पर्धा मिळते. जिओच्या या प्लॅनमध्ये 300Mbps स्पीडने अनलिमिटेड डेटा, कॉलिंग ऑफर केले जाते. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar आणि इतर लोकप्रिय OTT सदस्यत्व उपलब्ध आहेत.

Story img Loader