Reliance Jio देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशामध्ये सर्वात पहिल्यांदा ५जी नेटवर्क सुरु केले आहे. अनेक शहरांमध्ये कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. रिलायन्स जिओकडे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक डेटा बूस्टर प्लॅन आहेत. देशातील खाजगी कंपन्यांमध्ये Jio सर्वात परवडणारी टेलिकॉम कंपनी समजली जाते. ज्यांचा बेस प्रीपेड प्लॅन संपल्यानंतर ज्यांना अतिरिक्त डेटाची गरज भासते त्यांच्यासाठी डेटा बूस्टर प्लॅन फायदेशीर ठरतात.
डेटा बूस्टर प्लानचा वापर करण्यासाठी वापरकर्त्यांकडे बेस प्रीपेड प्लॅन असणे आवश्यक आहे. आज आपण असे काही डेटा बूस्टर प्लॅन पाहणार आहोत. त्याची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
हेही वाचा : Phone Pe च्या नवीन फीचरमधून इन्कम टॅक्स कसा भरायचा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
जिओचे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बूस्टर प्लॅन
रिलायन्स जिओचे १०० रुपयांच्याखालील एकूण पाच बूस्टर प्लॅन आहेत. पाचपैकी दोन कंपनीने नुकतेच लॉन्च केले आहेत. या पाच प्लॅनमध्ये १५,१९,२५,२९ आणि ६१ रुपये असा प्लॅन्सचा समावेश होतो. यामध्ये डेटाची मर्यादा वेगवेगळी असते. मात्र या पाच प्लॅनमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे त्या प्लॅन्सची वैधता.
रिलायन्स जिओच्या डेटा बूस्टर प्लॅनमध्ये वैधता एकसारखीच असते. ती वैधता बेस प्रीपेड प्लॅन सारखीच असते. उदाहरणार्थ, जर का वापरकर्त्याचा प्रीपेड प्लॅन ३० दिवस सक्रिय असे तर बूस्टर प्लॅन देखील ३० दिवसांसाठी सक्रिय राहतो. १५ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबी डेटा, १९ रुपयांमध्ये १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच २५ रुपयांमध्ये २ जीबी डेटा , २९ रुपयांमध्ये २.५ जीबी डेटा आणि शेवटच्या म्हणजेच ६१ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ६ जीबी डेटा मिळणार आहे.
हेही वाचा : Unpacked 2023: सॅमसंग लॉन्च करणार ‘हे’ गॅजेट्स; कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह इव्हेंट?
रिलायन्स जिओकडे १०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे देखील प्लॅन्स आहेत. यामध्ये १२१ आणि २२२ रुपयांचे दोन प्लॅन येतात. या प्लॅनमध्ये अनुक्रमे १२ जीबी आणि ५० जीबी डेटा वापरकर्त्यांना वापरण्यासाठी मिळतो. जर तुम्ही Jio च्या 5G कव्हरेज अंतर्गत असाल, तर तुम्हाला डेटाबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्हाला कंपनीकडून खरोखर अनलिमिटेड डेटा मिळतो.