Jio Recharge : आजच्या काळात प्रत्येकजण आपला वेळ सोशल मीडियावर देत असतो. व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, फेसबुक आपण रोज स्क्रोलिंग करत असतो. नवीन काहीतरी पाहत असतो. सध्या इंस्टाग्रामवरील रिल्स पाहण्याचा ट्रेंड आहेत. जर तुम्ही तुमचा मोबाईलचा डेटा फक्त सोशल मीडियावर स्क्रोल करण्यासाठीच वापरत असाल तर जिओने काही स्वस्त असे प्रीपेड प्लॅन्स आणले आहेत. तुमच्याकडे ऑफिस आणि घरी वायफायची सुविधा असेल आणि मोबाईल डेटा फार क्वचितच वापरला जात असेल तर तुम्ही जिओच्या या प्लॅन्सचा विचार करू शकता.
जे फक्त दैनंदिन १ जीबी डेटा आणि एसएमएस तसेच कॉलिंग या साठी काही प्लॅन शोधत असतील तर २०० रुपयांपेक्षा स्वस्त असे प्रीपेड प्लॅन जिओने आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. जे १ महिन्यासाठी वैध असणार आहेत.
हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओने आणला तीन महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या
Jioचा २०९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
२०९ रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना २८दिवसांची वैधता , अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस अशी ऑफर मिळणार आहे. दररोज १ जीबी असा २८ दिवसांसाठी २८ जीबी डेटा या प्लॅनमध्ये मिळतो. तसेच JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.
Jioचा 179 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
१७९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दररोज युजर्सना मिळते. तसेच JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.
Jioचा 149 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन युजर्सना परवडणारा आहे पण , हा प्लॅन केवळ २० दिवसांसाठी वैध आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग , १०० एसएमएस आणि दररोज १ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.
हेही वाचा : परदेशात जाताय? जाणून घ्या Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ रोमिंग पोस्टपेड प्लॅन्स
Jioचा 119 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
तुम्हाला अधिक परवडणारा प्लॅन हवा असेल आणि तुम्ही १४ दिवसांची वैधता असणाऱ्या प्लॅनचा विचार करू शकता. हा प्लॅन ११९ रुपयांचा आहे. अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि युजर्सना १.५ जीबी डेटा वापरण्यास मिळतो.
Jioचा 259 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
ज्या युजर्सना पूर्ण एक महिन्याची वैधता आणि दररोज २ जीबी पेक्षा कमी डेटा असा प्लॅन हवा आहे त्यांनी २५९ रुपयांच्या प्लॅनचा विचार करायला हवा. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १.५ जीबी डेटा , १०० एसएमएस दररोज वापरण्यास मिळतात.