रिलायन्स जिओ म्हणजेच ‘जिओ’ ही भारतामधील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी कायमच नवनवीन प्लॅन्स लॅान्च करत असते, ज्यात वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळतात. अनेकदा ऑफिसचं काम किंवा कॉलेजचे प्रोजेक्ट यासाठी अतिरिक्त मोबाइल डेटा लागतो. १जीबी हा डेटा सहसा कोणत्याच वापरकर्त्यांना पुरत नाही. तर ही बाब लक्षात ठेवून जिओ कंपनी ग्राहकांसाठी अतिरिक्त बोनस डेटाचे खास दोन प्लॅन घेऊन आली आहे.

जिओ कंपनीचे अतिरिक्त डेटा ऑफर करणारे हे दोन्ही प्लॅन्स ५जी प्रीपेड वापरकर्त्यांसाठी असणार आहेत; तर जिओने लॅान्च केलेल्या या दोन प्लॅन्सबद्दल जाणून घेऊ…

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

१. जिओने ग्राहकांसाठी लॅान्च केलेला पहिला प्लॅन ३९९ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल्स, दिवसाला १०० एसएमएस आणि रोज ३जीबी डेटा असणार आहे. तसेच या प्लॅनवर आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ६जीबी अतिरिक्त डेटा म्हणजेच ६१ रुपयांचा मोफत डेटा व्हाउचर ग्राहकांना मिळणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहक जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडच्या सबस्क्रिप्शनचा आनंद घेऊ शकणार आहेत. या प्लॅनचा कालावधी २८ दिवसांचा असेल.

२. जिओने ग्राहकांसाठी लॅान्च केलेला दुसरा प्लॅन २१९ रुपयांचा असेल. या प्लॅनमध्ये दररोज ३जीबी डेटा, अमर्यादित कॉल्स, दिवसाला १०० एसएमएस असणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त जिओ या प्लॅनमध्ये ग्राहकांना २जीबी बोनस डेटा देतो आहे. या प्लॅनचा कालावधी १४ दिवसांचा असेल; ज्यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड सबस्क्रिप्शन उपल्बध असणार आहे.

हेही वाचा…CES 2024: LG ने केली कमाल! सादर केला जगातील पहिला वायरलेस ट्रान्सपरंट TV…

हे प्लॅन्स नेहमीच्या किमतीपेक्षा थोडे जास्त महाग आहेत. पण, तुमच्या मोबाइल डेटाची डेली लिमिट (Daily Limit) म्हणजेच दररोजचा दीड जीबी डेटा जेव्हा ९० टक्के संपतो, तेव्हा आपण अतिरिक्त २० ते ५० रुपयांपर्यंत छोटासा रिचार्ज करतो आणि पुन्हा डेटा वापरण्यास सुरुवात करतो. या सगळ्यादरम्यान ग्राहकांचे अधिक पैसे जातात; तर ही बाब लक्षात ठेवत जिओने ग्राहकांसाठी हे खास प्लॅन ऑफर केले आहेत.